कयाधू पुनरूज्जीवनार्थ १५४ गावांत दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:35 PM2018-05-25T23:35:51+5:302018-05-25T23:35:51+5:30

काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिंडी जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिरवी झेंडी दाखविली.

 Dandi in 154 villages for Kyaadhoo rejuvenation | कयाधू पुनरूज्जीवनार्थ १५४ गावांत दिंडी

कयाधू पुनरूज्जीवनार्थ १५४ गावांत दिंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिंडी जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मनियार, ्जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. किशन लखमावार, डॉ. संजय नाकाडे, डॉ. प्रेमेंद्र बोथरा आदींची उपस्थिती होती. दरम्यान, रॅलीसाठी मदत करणाऱ्यांचा आमदार व जिल्हाधिकारी, सीईओंच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेली कयाधू नदी पासवाळ्यात कधी-कधी आक्राळ-विक्राळ रुप करु वाहते. ती जिल्ह्यात ८४ किलोमीटर क्षेत्रातून वाहते. मात्र पाऊस ओसरताच दुसºया दिवशी नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने वर्षभर जिल्ह्यातील लोकांना पाण्याच्या एका -एका थेंबासाठी भटकण्याची वेळ येते. ती वेळ कायमची थांबावी म्हणून नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. राजस्थानमध्ये डॉ.राजेंद्रसिंग राणा यांनी आठ नद्यांचे पुन्नरुजीवन केले. त्यामुळे त्या भागातील लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. त्यामुळे त्यांचा हाच उपक्रम महाराष्टÑभर राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर हिंगोलीत ही मोहीम हात घेतली. या नदीच्या काठावर जवळपास १५४ गावे, वाड्या, वस्त्या वसलेल्या आहेत. त्यामुळे त्या-त्या गावक्षेत्रात ही जलचळवळ राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नदीला जिल्ह्यातील ११७५ कि.मी. अंतरावरून लहान-मोठे ओढे, नाले आणि पाट येऊन मिळतात. कयाधू नदीची एकूण लांबी ८४ किलोमीटर असून, तिला येऊन मिळणाºया ओढ्यांची लांबी ११७५ कि.मी. एवढी आहे. सर्व काही व्यवस्थित असले तरीही नदी कोरडीठाक झाली आहे. त्यामुळे तिला जिवंत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी कळमनुरी, सेनगाव, हिंगोली येथे दहा दिवस जलदिंडी निघणार आहे. या दिंडीत जवळपास ५० महिला आणि ५० पुरुष सहभागी झाले असून, त्या- त्या गावातील ग्रामस्थ हे पाच किमी अंतरापर्यंत सहभागी होणार आहेत. असे एकूण दीड हजाराच्या जवळपास ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे संस्थाध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले. तर रॅलीत महिला लेझीम पथक सर्वांचे आकर्षण ठरले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी जलयुक्त विभागासह विविध शासकीय कर्मचाºयांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ही आप- आपल्या कर्मचाºयांना सूचना देणार असल्याचे सांगितले.
पाणलोट क्षेत्रातील जुने पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, सीसीटी, लूझ बोल्डर, गॅबियन बंधारे बांधणे, बुडी, डोह पुनरुज्जीवित करणे, जुने सिमेंट बांध, मातीबांध यांची दुरुस्ती, खोलीकरण करणे, शेततळे घेणे, बोअर पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे, ओढ्याचे खोलीकरण करणे ही कामे केली जाणार आहेत.
डॉ. किशन लखमावार आणि डॉ. संजय नाकाडे यांच्यावतीने रॅलीतील सहभागी पैकी कोणाची प्रकृती बिघडल्यास प्रथमोउपचार पेटी दिली. तर सोर्सा कॉम्प्युटरच्या वतीने लिंबू पाण्याची दिलेली पाकिट जिल्हाधिकाºयांच्या हस्ते रॅलीतील सहभागींना वाटली.
पूर्वी संत गाडगे महाराज गोपाल काल्यानंतर कीर्तनांतून लोकांना प्रबोधन करत असत, तसेच या जलदिंडीद्वारेही घरोघर भाकरी मागून एकत्र येत गोपालकाला केला जाणार आहे. गोपाल काल्यानंतर नदीच्या पुनरुजीवनासाठी जनजागृती केली जाणार आहे.
रॅलीच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर आ. तान्हाजी मुटकुळे व आ. रामराव वडकुते म्हणाले, तेथे जेव्हा गरज भासेल तेव्हा मदत मागा आम्ही काही वेळातच मदतीसाठी धावून येऊ. तर त्या- त्या गावातील कार्यकर्त्यांना सूचनाही देतो.
अशी केली जाईल जनजागृती
४नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रथम ग्रामस्थांना पुनरुज्जीवत केले जाईल. त्यांनी श्रमदान करून आपल्या परिसरातील डोंगरमाथ्यावर सीसीटी, डीपीसीसीटी, बांध बंदिस्ती करावी, यासाठी ते यातून पुढे येतील, असे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले.

Web Title:  Dandi in 154 villages for Kyaadhoo rejuvenation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.