सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:31 PM2018-07-16T17:31:55+5:302018-07-16T17:34:01+5:30

शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले.

Congress agitation for demand of crop loan in Sengawa | सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे 

सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे 

googlenewsNext

सेनगाव (हिंगोली ) : शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले.

खरीप हंगामात तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांना नाम मात्र पिक कर्ज वाटले आहे. कर्जासाठी शेतकरी दररोज बँकेचे खेटे मारीत आहे. या विरोधात तालुका काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व खासदार राजीव सातव यांनी केले. यावेळी खा. सातव यांनी  केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे, शेतमालाला भाव नाही, बँका पिक कर्ज देत नाही अशी परिस्थिती सध्या असून शासनाची कर्ज माफी फसवी असल्याचा आरोप सातव यांनी केला. 

आंदोलनात तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सतिश खाडे,जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सरनाईक, डॉ. रवी पाटील, भागोराव राठोड,नगरसेवक विलास खाडे, प.स.सदस्य रायाजी चोपडे,हरीभाऊ गादेकर, श्रीरंग कायदे, संतोष खाडे,अजय विटकरे, अमरदिप कदम, दिलीप होडबे आदीसह तालुक्यातील शेतकरी ,कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह ,तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
 

Web Title: Congress agitation for demand of crop loan in Sengawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.