हिंगोेली जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी भरविले कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:06 AM2018-01-22T00:06:38+5:302018-01-22T00:14:02+5:30

एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अंतर्गत तालुकास्तरांवर कॅम्प भरवून माहिती देण्यात आली. महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता जि. प. समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्विकारले जात आहेत.

Camp organised for scholarship in Hingoli district | हिंगोेली जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी भरविले कॅम्प

हिंगोेली जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी भरविले कॅम्प

googlenewsNext
ठळक मुद्देबंद पोर्टलमुळे आॅफलाईन कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अंतर्गत तालुकास्तरांवर कॅम्प भरवून माहिती देण्यात आली. महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता जि. प. समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्विकारले जात आहेत.
जि. प. समाज कल्याण विभागातर्फे देण्यात येणा-या सर्व शिष्यवृत्ती योजने संदर्भात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना शासनाकडून होत्या. मात्र पोर्टलमधील वारंवार होणा-या बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांची माहिती भरली गेली नाही. सदर माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. परंतु शिष्यवृत्तीसाठी आॅफलाईन पद्धतीने माहिती स्विकारली जात आहे. जि. प. समाजकल्याण विभागा अंतर्गत दिली जाणारी, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रीकपुर्व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, माध्यमिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना पोर्टलवरून वगळून आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ज्यांनी अद्याप अर्ज सादर केला नाही, त्यांनी आता थेट जि. प. समाजकल्याण विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास संबधित मुख्याध्यापकास जबाबदार धरले जाणार आहे.

अर्ज सादर करण्याचे आवाहन
प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी कॅम्प भरून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्ज प्रक्रीयेची पद्धत कशाप्रकारे आहे, याचे फॉर्मेट त्यांना देण्यात आले. ठिकठिकाणी कॅम्पचे आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोव पंचायत समिती येथे कॅम्प भरून माहिती दिली. हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ वसमत येथे मार्गदर्शन करण्यात आले. ११ ते १५ जानेवारी दरम्यान आॅफलाईन शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Camp organised for scholarship in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.