कनेरगावात व्यापाऱ्याची बॅग पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:54 PM2019-01-31T23:54:50+5:302019-01-31T23:55:03+5:30

हिंगोली शहरातील मनीष एजन्सीच्या गाडीचा पाठलाग करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग पळवल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

 The bag of merchandise ran in Kanarga | कनेरगावात व्यापाऱ्याची बॅग पळविली

कनेरगावात व्यापाऱ्याची बॅग पळविली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगाव नाका : हिंगोली शहरातील मनीष एजन्सीच्या गाडीचा पाठलाग करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग पळवल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
चालक संतोष पांडुरंग खांदवे (रा. पुसद) व क्लिनर पंढरी भोस (रा. अंधारवाडी, ता. हिंगोली) हे पिकअप क्र. एमएच-३८-ई-२७०३ या वाहनातून गोरेगाव, सिरसम या गावात माल विक्री करुन परत येत असताना रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तीन दुचाकीस्वारांनी विनाक्रमांकाची दुचाकी पिकअपला समोरून आडवी लावली. हातात दगड घेऊन चालकाला खिडकी उघडण्यास बजावले.
चालकाने खिडकी उघडल्यानंतर गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग व वाहनाच्या चावीसह पोबारा केला. चालकाने आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थ गोळा झाले. मात्र तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले होते. घटनेची माहिती कनेरगाव नाका पोलीस चौकीला देण्यात आली. त्यानंतर कनेरगाव पोलीस चौकीतील विजय महाले व मोहन धाबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोउपनि बालाजी तिप्पलवाड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नाकाबंदीचा प्रयत्न केला. मात्र हाती काही लागले नव्हते.

 

Web Title:  The bag of merchandise ran in Kanarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.