अन् राजकीय शांतता पसरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:28 AM2018-12-15T00:28:05+5:302018-12-15T00:28:24+5:30

जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.

 And political peace spread ... | अन् राजकीय शांतता पसरली...

अन् राजकीय शांतता पसरली...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.
लोकसभा निवडणुकीला सहा महिने राहिले. ही निवडणूक लढणाऱ्यांनी मैदानात उतरणे साहजिक आहे. मात्र विधानस इच्छुकांनीच त्या आधी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने मोठी गोची निर्माण झाली होती. लोकसभेचे घोडे बाजूलाच अन् ही मंडळीच उतावीळपणा करून चर्चेत येत होती. त्यात आताच निवडणुका नसल्याने धसमुसळेपणा वाढीस गेल्याने वातावरणही तंगले होते. एक-दोन मतदारसंघातील ठरावीक मंडळीच या रणांगणात आधीच उतरल्याचे दिसत होते. मात्र आता लोकसभा असो वा विधानसभा. कोणत्याही निवडणुकीसाठीचा पुढारी घराबाहेरही पडत नसल्याचे दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरीही या पक्षाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात मरगळ झटकली नाही. खा.राजीव सातव आले की, अ‍ॅक्टिव्ह होणारा हा पक्ष त्यांच्या दिल्ली दौºयात निपचित पडून राहतो. या पक्षात अनेकांना विधानसभेचे वेध लागल्याने ही मंडळी तेवढी चर्चेत येण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र जनमाणसात जावून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न स्पर्धेपुरताच उरल्याचे दिसत आहे. भाजप तर सत्ताधारी असल्याने त्यांनी नेतेमंडळी जमा करून ठेवली. मध्यंतरी सीएम चषकाच्या निमित्ताने या मंडळींनी लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यातही काही जणांचाच पुढाकार होता. जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांची भ्रमंती तेवढाच पक्षाचा कार्यक्रम असतो. राष्ट्रवादीची वरिष्ठ नेतेमंडळी कमालीची कामाला लागल्याचा साक्षात्कार हिंगोली जिल्ह्यालाही होत आहे. दर आठ दिवसाला कुणीतरी वरिष्ठ नेता येतो. स्थानिकांना कामाला लावतो. शिवसेनेत तर लोकसभा उमेदवाराचा शोधच संपणार नसल्याचे दिसत असून त्यांना ही जागा लढायची की नाही? असा संभ्रम निर्माण होण्याइतपत परिस्थिती गंभीर आहे.
मध्यंतरी कळमनुरीचे काँग्रेस आ.संतोष टारफे व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यात रंगलेल्या कलगीतुºयामुळे चर्चेत असलेली सेना आता पुन्हा थंड पडल्यात जमा आहे. एकंदर जिल्ह्यातील प्रमुख पक्षांसारखीच इतरांचीही स्थिती आहे. इतरही कोणी मैदानात उतरणार असल्याचे संकेत देत नसल्याचे चित्र आहे.

Web Title:  And political peace spread ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.