कृषी महोत्सवास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:24 AM2018-02-17T00:24:59+5:302018-02-17T00:25:06+5:30

शहरातील रामलीला मैदान येथे शनिवारी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

 The Agricultural Festival started today | कृषी महोत्सवास आजपासून प्रारंभ

कृषी महोत्सवास आजपासून प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील रामलीला मैदान येथे शनिवारी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. विक्रम काळे, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. संतोष टारफे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. सतीश चव्हाण, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदी उपस्थित राहणार आहेत. कृषी महोत्सवात उपस्थित राहण्यचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, प्रकल्प संचालक ए. एम. देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे आदींनी केले. शेतकºयांसाठी विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, शेतीतील नावीन्यपूर्ण बाबी, शेतकºयांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन इत्यादींबाबत माहितीपर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. याठिकाणी शेतीशी निगडीत विविध कंपन्या, शेती अवजारे आदींचे स्टॉल राहणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title:  The Agricultural Festival started today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.