९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:15 AM2018-02-22T01:15:16+5:302018-02-22T01:15:20+5:30

राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे.

 9 3 Application for increased demand for farmers | ९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज

९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे.
कळमनुरी तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ साठी जमिनी संपादित करून शेतकºयांना मावेजाही अदा करण्यात आला आहे. मात्र अनेक शेतकºयांनी या जमिनीचे दर कमी मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यातील काहीजण तर भूमिहीनच होणार असल्याने ही जमीन गेल्याने भविष्यच हरवत असल्याचे सांगत आहेत. तर काहींना शेजारी रक्कम जास्त मिळाली व आम्हाला कमी मिळाली, असे वाटत आहे. शासनाने लवाद म्हणून जिल्हाधिकाºयांची नेमणूक केली असून दाखल झालेल्या अर्जांवर त्यांच्याकडेच सुनावणी होणार आहे.
यात डोंगरकडा येथील ३७ शेतकºयांची सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. तर याच गावातील आणखी ३0 शेतकºयांची सुनावणी १ मार्च रोजी होणार आहे. तर कळमनुरी तालुक्यातील वरूड येथील २७ शेतकºयांची सुनावणी ३ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.
या राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकºयांपैकी अनेकांची सुरुवातीपासूनच दराबाबत ओरड सुरू आहे. तर काही गावांतून शेजारच्या गावाला राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनीस जास्त दर व आम्हाला कमी का? अशी ओरड होती. आता तर रीतसरपणे लवादाकडे तक्रारीच दाखल केलेल्या आहेत. सिंचनाच्या पट्ट्यातील या जमिनी असल्याने व त्या संपादित होत असल्याने शेतकºयांना वाढीव मावेजाची आस आहे.

Web Title:  9 3 Application for increased demand for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.