हिंगोलीत नियम उल्लंघनाच्या ७ हजार केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:27 AM2018-10-11T01:27:48+5:302018-10-11T01:28:23+5:30

शहरातील दिवसेंदिवस वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी बनत चालली आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कमी नाही. केवळ दंडात्मक कारवाई करूनही हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे प्रत्येकांनीच वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७ हजार २७८ चालकांकाकडून मागील नऊ महिन्यांत तब्बल २० लाख २७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

7 thousand cases of violation of the rule of Hingoli | हिंगोलीत नियम उल्लंघनाच्या ७ हजार केसेस

हिंगोलीत नियम उल्लंघनाच्या ७ हजार केसेस

Next
ठळक मुद्देदंडात्मक कारवाई : मागील नऊ महिन्यांत तब्बत २० लाखांचा दंड वसूल

दयाशिल इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील दिवसेंदिवस वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी बनत चालली आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कमी नाही. केवळ दंडात्मक कारवाई करूनही हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे प्रत्येकांनीच वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७ हजार २७८ चालकांकाकडून मागील नऊ महिन्यांत तब्बल २० लाख २७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली शहरात साधे वाहतूक सिग्नल नाहीत ही आश्चर्याची बाब आहे. पालिकेने लाखों रूपये खर्च करून दहा वर्षापूर्वी बसविलेले वाहतूक सिग्नल आजही धूळखात पडून आहेत. हिंगोली शहरातील बसस्थानक, इंदिरा गांधी चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवाहर रोड, आदी गर्दीच्या ठिकाणी ये-जा करणाºया वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातच फळविक्रेत्यांची हातगाडे व दुचाकी व इतर वाहने रस्त्यावरच उभी असतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दरदिवशी शिस्त लागावी यासाठी कारवाई केली जाते. परंतु वाहने ‘आम्ही वाहने कुठे उभी करावी, शहरात पार्किंगची व्यवस्था कुठे आहे’ असा प्रश्न उपस्थित केला जातो. या कारणावरून अनेकदा पोलिसांसोबत वादही होतात. शहरात बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय अनेकदा अपघाताच्या किरकोळ घटनांही घडतात. काही दिवसांपूर्वी हातगाडेवाले आणि पोलिसांत मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु कारवाई करूनही याला आळा बसत नाही.
शहरातून सर्रासपणे जड वाहतूक
जड वाहनांच्या वाहतूकीसाठी वाशिम व नांदेड मार्गे येणाºया हिंगोलीत बायपासची सुविधा आहे. परंतु वाहने थेट शहरातूनच धावतात. पोलिसांकडून जड वाहतूक करणाºयांवर कारवाई केली जाते. हिंगोली येथून ग्रामीण भागाकडे जाणार बसेसची संख्याही कमी आहे. अनेक गावांत बस पोहचत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही. परंतु या खाजगी वाहनांतून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून नेले जातात. अवैध प्रवासी वाहतूक करणाºया एकूण ३०१ वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरून वर्दळीच्या ठिकाणावरून वाहने सुसाट पळविणा-या एकूण १५ वाहन चालकांवर वाहतूक शाखेतर्फे विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन पळविणा-यांची वाहनेही पोलिसांनी जप्त केली होती. यांमध्ये दोन महिला, दोन पुरुष यांचा समावेश आहे.
शहरातून राँगसाईटने वाहन चालविणाºया ७४४ जणांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून वाहतूक शाखेकडून दंड वसूल करण्यात आला.
यासह विना परवाना वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे उपलब्धच नसणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना नंबरप्लेट वाहने या चालकांवर विविध कलमान्वये वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. हिंगोली शहर वाहतूक शाखेत १ पोलीस अधिकारी व २० कर्मचारी कार्यरत आहेत.

Web Title: 7 thousand cases of violation of the rule of Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.