आरोग्य सुविधांसाठी ५५ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:19 AM2018-07-12T00:19:42+5:302018-07-12T00:19:57+5:30

जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कर्मचारी निवासस्थाने आदी कामांसाठी एनआरएचएम योजनेत ५५.३४ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. या एकूण १२ कामांसाठी तूर्त ५.२१ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे.

 55 crores sanctioned for health facilities | आरोग्य सुविधांसाठी ५५ कोटी मंजूर

आरोग्य सुविधांसाठी ५५ कोटी मंजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कर्मचारी निवासस्थाने आदी कामांसाठी एनआरएचएम योजनेत ५५.३४ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. या एकूण १२ कामांसाठी तूर्त ५.२१ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे.
अतिप्राधान्य क्रमाच्या जिल्ह्यात हिंगोलीचा समावेश आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधांचे बळकटीकरणासाठी एनआरएचएम या योजनेत निधी देण्याचे प्रवाधान आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातील विविध कामांचे १२ प्रस्ताव पाठविले होते. ते सर्व मंजूर झाले आहेत. या योजनेत राज्यात एकूण १३७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यापैकी दहा टक्के एकट्या हिंगोली जिल्ह्याचे आहेत.
यामध्ये सेनगाव तालुक्यातील गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उर्वरित राहिलेल्या कर्मचारी निवासस्थानांसाठी १.८७ कोटी, कळमनुरी तालुक्यात वाकोडी व मसोडला पीएचसीत कर्मचारी नवीन निवासांसाठी प्रत्येकी ३.७२ कोटी, हिंगोली तालुक्यात फाळेगाव, नर्सी नामदेव व औंढा तालुक्यात जवळा बाजार पीएचसीत मुख्य इमारत व कर्मचारी निवासासाठी प्रत्येकी ५.६0 कोटी मंजूर झाले आहेत. सेनगाव तालुक्यात ब्रह्मवाडी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व १४ कर्मचारी निवासांसाठी ५.७७ कोटी तर भानखेड्यात याच कामांसाठी ५.७0 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर सेनगाव तालुक्यातील कवठा व औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथे उर्वरित राहिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासाच्या कामास प्रत्येकी ४.९५ कोटी मंजूर झाले आहेत. तर आरोग्य विभागाच्या जिल्हा शिक्षण व संवाद केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी १.९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते.
राज्य स्तरावरून निविदा
नव्याने मंजूर कामांची निविदा प्रक्रिया राज्य स्तरावरून अधीक्षक अभियंता अथवा विभागावर कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत काढण्यात येणार आहेत. सध्या तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरीसह अंदाजपत्रकांत काही बदल करायचे असल्यास ते तातडीने सुचविण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. निविदा प्रक्रिया करून ही कामे सुरू करण्यासाठी ५.२१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यात ३0 लाखांपासून ते १ कोटीपर्यंत कामनिहाय निधीचे वितरण शासनाने केले.
फाळेगावची मागणी पूर्ण
फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जि.प.सदस्या अनुराधा माधवराव जाधव यांनी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे येथे नवीन इमारत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना जुन्या इमारतीपासून सुटका मिळणार आहे.

Web Title:  55 crores sanctioned for health facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.