बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आला अंगलट; वसमत जवळ अपघात ३ तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:20 PM2018-06-06T18:20:17+5:302018-06-06T18:20:17+5:30

वसमत-नांदेड रस्त्यावर चंदगव्हाण  शिवारात दुचाकी बसवर धडकून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला

3 youth killed in accident while attempting to move ahead of the bus near vasmat | बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आला अंगलट; वसमत जवळ अपघात ३ तरुण ठार

बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आला अंगलट; वसमत जवळ अपघात ३ तरुण ठार

googlenewsNext

वसमत ( हिंगोली ) : वसमत-नांदेड रस्त्यावर चंदगव्हाण  शिवारात दुचाकी बसवर धडकून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. मृत तिघेही वसमत येथील एकाच नगरातील रहिवासी होते. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी नांदेड - वसमत ही बस (एमएच २० बीएल ३५९९)  वसमत कडे निघाली. याच वेळी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान यात संजय कांबळे, सुनील खरे व इंगोले हे एका दुचाकीवरून (क्र. एमएच २६ के २७५ ) वसमत कडे येत होते. वसमतजवळील चंदगव्हाण शिवारात त्यांनी दुचाकी समोरच्या बसच्या पुढे नेण्याच्या प्रयत्न केला.मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि ते बसच्या मागील बाजूवर जोरदार धडकले. यात दुचाकीवरील संजय व सुनील जागीच ठार झाले. तर इंगोले याचा उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात येत असताना मृत्यू झाला. 

Web Title: 3 youth killed in accident while attempting to move ahead of the bus near vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.