तीन अपघातांत १ ठार; ७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:19 AM2018-11-20T00:19:21+5:302018-11-20T00:19:42+5:30

तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी तीन अपघात झाले. यामध्ये वगरवाडीनजीक झालेल्या अपघातामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला

 1 killed in three accidents; 7 injured | तीन अपघातांत १ ठार; ७ जखमी

तीन अपघातांत १ ठार; ७ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी तीन अपघात झाले. यामध्ये वगरवाडीनजीक झालेल्या अपघातामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर अपघातामध्ये ७ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड व परभणी येथे उपचार सुरू आहेत.
वगरवाडी येथील औंढा-परभणी या राज्य रस्त्यावर पिकअप-दुचाकीचा समोरासमोर सायंकाळी ५ वाजता अपघात झाला. यामध्ये पंजाबराव परसराम नवघरे (४०, पांग्री नवघरे ता.मालेगाव), रामराव धाबे (५२, धोंडगा बुद्रूक), विजय सदाशिव दवणे, गोविंदा सखाराम जाधव (दोघे रा.वाघीसिंगी ता.वसमत) हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारार्थ केले होते; परंतु गंभीर मार लागल्याने सर्वांना हिंगोली येथे पाठविण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान पंजाबराव परसराम नवघरे यांचा मृत्यू झाला आहे.
खड्ड्यांमुळे अपघात
जवळा बाजार येथून आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना बबन नारायण कुटे (रा.साळणा ता.औंढा) यांची दुचाकी सायंकाळी ६ च्या सुमारास औंढा- जिंतूर रस्त्यावर असलेल्या गोळेगाव महाविद्यालयासमोर वाहन खड्ड्यांत गेल्याने नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
यामध्ये त्यांना गंभीर मार लागला आहे. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. राज्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला आहे.
औंढा- पिंपळदरी दुचाकीच्या अपघातामध्ये शिवप्रसाद तुकाराम देवकर, सोनाजी तुकाराम मुकाडे, प्रमोद यादवराव खताळ हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.
सर्व जखमींवर वैद्यकीय अधीक्षक रमेश काळे यांनी उपचार केले.

Web Title:  1 killed in three accidents; 7 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.