तुमचा फिटनेस ट्रेनर असू शकतो अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:55 PM2017-12-26T17:55:12+5:302017-12-26T17:57:53+5:30

ट्रेनर सर्टिफाइड आहे की नाही, हे तपासायलाच हवं..

Your fitness trainer can be half-skilled! | तुमचा फिटनेस ट्रेनर असू शकतो अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला!

तुमचा फिटनेस ट्रेनर असू शकतो अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला!

Next
ठळक मुद्देआपण ज्या जिममध्ये जातोय, तिथला ट्रेनर चांगला फिट दिसतोय, म्हणजे तो प्रशिक्षितच असेल हा समज आधी आपल्या डा्रेक्यातून काढून टाकायला हवा.ट्रेनरचं ज्ञान अद्ययावत असावं.पूर्वी जो व्यायाम उत्तम समजला जात होता त्यातले काही नंतर चुकीचे आणि घातक ठरवण्यात आले आहेत. या साºया बदलांची माहिती ट्रेनरला असायलाच हवी.

- मयूर पठाडे

थोडा वेळ गेला तरी चालेल, पण ज्या व्यक्तीकडून आपण व्यायामाचे धडे घेणार आहोत, तो ट्रेनर योग्यच असायला हवा. नाहीतर पैसा आणि घाम गाळूनही पुन्हा आपल्या पदरी निराशाच येऊ शकते. ट्रेनर मग तो जिममधला असो, नाहीतर तुम्हाला घरी येऊन शिकवणारा खासगी ट्रेनर, त्याचं ज्ञान अद्ययावतच हवं.
जिममध्ये जायला सुरुवात केल्यानंतर अनेक जण आपल्याला सरळ तिथल्या ट्रेनरच्या हवाली करून टाकतात. तो जे सांगेल त्यावर निमूटपणे विश्वास ठेवतात. अर्थात फिटनेस ट्रेनरचं ऐकायलाच हवं, पण तो जर योग्य प्रशिक्षित असला तर!
आपण ज्या जिममध्ये जातोय, तिथला ट्रेनर चांगला फिट दिसतोय, म्हणजे तो प्रशिक्षितच असेल हा समज आधी आपल्या डा्रेक्यातून काढून टाकायला हवा. कारण आजही अनेक जिममध्ये प्रशिक्षित ट्रेनर नसतो. त्याऐवजी ज्यानं व्यायामाच्या बळावर आपली बॉडी कमावली आहे, एखाद-दुसºया जिममध्ये ट्रेनर म्हणून काम केलं आहे, त्यालाच ट्रेनर म्हणून नेमतात. असा ट्रेनर सर्टिफाइड असेलच असं नाही. सर्टिफाइड ट्रेनरनं काही लेखी आणि प्रॅक्टिकल टेस्ट दिलेल्या असतात. नामांकित संस्था ट्रेनरसाठी अशा परीक्षा घेतात आणि त्यानंतरच त्यांना ट्रेनरचं सर्टिफिकेट देण्यात येतं. थोडक्यात आपला ट्रेनर अल्प प्रशिक्षित, लेस स्क्ल्डि आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला नसावा.
चांगल्या ट्रेनरचं ज्ञान अद्ययावत असावं. कारण अगदी व्यायामाच्या पद्धतीमध्येही संशोधनानंतर त्यातील काही पद्धती बंद करण्यात आल्या आहेत आणि त्या चुकीच्या ठरवण्यात आल्या आहेत. पूर्वी जो व्यायाम उत्तम समजला जात होता आणि ट्रेनर, व्यायामपटू आवर्जुन जो व्यायाम करायचे, त्यातले काही व्यायाम नंतर चुकीचे आणि घातक ठरवण्यात आले आहेत. या साºया बदलांची माहिती ट्रेनरला असायलाच हवी. त्यासाठी नियमितपणे त्यानं ट्र;ेनिंग घ्यायला हवं.
काही जण ट्रेनर म्हणून तर काम करतात, पण टाइमपास म्हणून. त्यांचं ध्येय दुसरंच काहीतरी असतं, हा जॉब ते मनापासून करत नसतात आणि त्याविषयी त्यांना प्रेम, ममत्त्वही नसतं. असे ट्रेनर तुम्हाला आवश्यक ती माहिती देतीलच याची कोणतीच खात्री नाही.
विशेषत: महिलांच्या बाबतीत धोक्याचा सल्ला म्हणजे काही ट्रेनर्स फ्लर्टही असू शकतात. त्यांच्यापासून लांबच राहायला हवं.

Web Title: Your fitness trainer can be half-skilled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.