धकाधकीचं आयुष्य, लॅव्हिश लाईफस्टाईल त्यासोबतच आॅफिस किंवा आपल्या व्यावसायातील ताण-तणाव यांच्यामुळे आपली आपली जीवनशैली बदलत चालली आहे. या ताणाचा परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावर होत असतो. पण, हा राग आपल्याला कंट्रोल करायचा असतो. मात्र, आपल्याला पर्यायच सापडत नाही. यावर योगामध्ये उपाय आहे. योगाच्या माध्यमातून आपल्याला रागावर नियंत्रण मिळवता येतं. अशी काही खास योगासने जी केली की तुमचा राग होईल छूमंतर...* परिणामकारक आसन - गोमुखासन...
- हे आसान करण्यासाठी पाय समोर आणा. त्यानंतर दोन्ही पाय एकमेकांवर आणून अशा पद्धतीनं बसा. त्यानंतर दोन्ही हात मागे नेऊन त्यांना दोन्ही हात एकमेकांशी जुळवा. त्यानंतर डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या आणि सो़डून द्या. या आसनानं तुमचं चित्त स्थिर होईल. या आसनामुळे तुमचे मन एकदम शांत होईल. ही प्रकिया पाच वेळा करा.* मनाला शांतता मिळवून देणारे आसन - अट्टाहास आसन
- या क्रियेमध्ये हात वर नेऊन मुक्तहास्य करावं. या क्रियेत मनापासून हसावं. असं आपण दिवसातून तीनदा केल्यास तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.* श्वासावर नियंत्रण मिळवून देणारे आसन : अब्डोमिनल ब्रीदिंग
- या क्रियेत एक हात पोटावर तर दुसरा हात छातीवर ठेवा. त्यानंतर श्वास घेऊन पोट फुगवा आणि श्वास सोडताना पोट आत घ्या. ही क्रिया पाच ते दहा वेळा करा.

 

Web Title: Yoga: To get control in anger, 'this' Yogas ... in a few days, will be angry!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.