World Sleep Day : चांगली झोप लागण्यासाठी घरात लावा 'ही' झाडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 10:51 AM2019-03-15T10:51:37+5:302019-03-15T10:52:28+5:30

आज म्हणजे १५ मार्च रोजी 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. हेल्दी राहण्यासाठी ज्याप्रमाणे हेल्दी खाण्या-पिण्याची गरज असते त्याचप्रमाणे चांगली झोपही महत्त्वाची असते.

World Sleep Day: These plants will help you to take sound sleep | World Sleep Day : चांगली झोप लागण्यासाठी घरात लावा 'ही' झाडे!

World Sleep Day : चांगली झोप लागण्यासाठी घरात लावा 'ही' झाडे!

googlenewsNext

(Image Credit : Medical News Today)

आज म्हणजे १५ मार्च रोजी 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. हेल्दी राहण्यासाठी ज्याप्रमाणे हेल्दी खाण्या-पिण्याची गरज असते त्याचप्रमाणे चांगली झोपही महत्त्वाची असते. चांगली झोप झाल्याने आपल्याला मानसिक रूपाने शांतता मिळते. आपलं मन आणि मूड फ्रेश राहतो. अर्थातच त्यामुळे आपलं कामही चांगलं होतं. अनेकजण नेहमीच चांगली झोप लागत नसल्याने त्रासलेले असतात. जर तुम्हालाही झोप येत नसेल तर याला जबाबदारही तुम्हीच आहात. 

वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जशा की, घर आणि ऑफिसमधील समस्या, तणाव, ब्रेकअप, कामाचा ताण, चिंता याने आपली झोप फार जास्त प्रभावित होते. मानसिक तणावामुळे चांगली लागत नाही किंवा झोपच येत नाही. पण यावर वेगवेगळे उपाय सांगितले जातात. त्यातीलच एक म्हणजे घरात काही खास झाडे लावली तर तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. ही झाडे फार मोठीही नसतात. रूमच्या एका कोपऱ्यात ही झाडे ठेवता येतात. याने घरातील वातावरण फ्रेश होईल, ज्यामुळे तणाव कमी होईल आणि आपल्याला चांगली झोपही येईल. 

लॅव्हेंडरचं झाड

(Image Credit : Fiskars)

लॅव्हेंडर ऑइलचा सुगंध मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि रिलॅक्स मिळवण्यासाठी मदत करतो. काही लोक त्यांच्या घरातील वातावरण फ्रेश करण्यासाठी लॅव्हेंडर एअरफ्रेशनरचा वापर करतात. याचा मनमोहक सुगंध घराच्या वातावरणाला सकारात्मक ऊर्जा देतो. लॅव्हेंडरचे झाड बेडरूमजवळ लावा. याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. 

चमेलीचे झाड

जर तुमच्या घरात चमेलीचे झाड असेल तर चमेलीच्या फुलांचा सुगंध तुमच्या अंगणालाच नाही तर घराच्या प्रत्येक कोपरा दरवळणारा करेल. त्यासोबतच चमेलीच्या फुलांच्या सुगंधाने तुमचा तणावही दूर होईल आणि तुम्हाला चांगली झोप येईल. जर तुम्हाला चांगली झोप आली तर तुम्हाला तुमचं काम करण्यासही मदत होईल. 

अ‍ॅलोव्हेरा

अ‍ॅलोव्हेराचं झाड हे लहान असतं. त्यामुळे हे झाड तुम्ही घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. हे झाड लावल्याने चांगली झोप येते. कारण अ‍ॅलोव्हेराचं झाड हे रात्री ऑक्सिजन सोडतं, ज्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर होतो. याने तुम्हाला चांगली झोप येण्यासही मदत होते.

स्नेक प्लांट

तसे तर अनेक लोक स्नेक प्लांट त्यांच्या घरात यासाठी लावतात की, त्यांच्या घराची सुंदरता वाढवावी. पण स्नेक प्लांट घराची सुंदरता वाढवण्यासाठीच नाही तर चांगली झोप येण्यासाठीही फायदेशीर आहे. त्यासोबतच हे झाड घराच्या वातावरणाला प्रदूषित हवेपासून वाचवतं. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं आणि तुम्ही चांगली झोप घेऊ शकता. 

Web Title: World Sleep Day: These plants will help you to take sound sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.