World No Tobacco Day 2019: सिगारेट ओढणाऱ्या महिलांमध्ये 60 टक्क्यांनी वाढते वंधत्वाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:30 PM2019-05-31T12:30:07+5:302019-05-31T12:32:54+5:30

मागील वर्षी वर्ल्ड अॅन्टी स्मोकिंग डेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये 82 टक्के कॉलेजमधील विद्यार्थीनीनी त्यांना स्मोकिंग कराया आवडतं असं सांगितलं होतं.

World no tobacco day 2019 smoking can increase infertility risk by 60 percent know everything about it | World No Tobacco Day 2019: सिगारेट ओढणाऱ्या महिलांमध्ये 60 टक्क्यांनी वाढते वंधत्वाची समस्या

World No Tobacco Day 2019: सिगारेट ओढणाऱ्या महिलांमध्ये 60 टक्क्यांनी वाढते वंधत्वाची समस्या

Next

(Image Credit : Elite Daily)

मागील वर्षी वर्ल्ड अॅन्टी स्मोकिंग डेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये 82 टक्के कॉलेजमधील विद्यार्थीनीनी त्यांना स्मोकिंग कराया आवडतं असं सांगितलं होतं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, स्मोकिंग करणं त्यांना का आवडतं? तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांना सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे त्यांना फार आनंद मिळतो. एवढचं नाही तर सर्वेदरम्यान त्यांना असं समजलं की, जवळपास 87 टक्के मुली फक्त आवड किंवा आनंद मिळतो म्हणून सिगरेट पितात. आता तुम्हाला असं वाटत असेल की, त्यांना धुम्रपान केल्यामुळे होणाऱ्या तोट्यांबाबत माहीत नसेल. पण असं काही नसून त्यांना त्याबाबत सर्व माहीत आहे. मुलींनी याबाबत बोलतान सांगितलं की, स्मोकिंग करताना त्यांना त्यामुळे होणाऱ्या तोट्यांबाबत काहीच लक्षात राहत नाही. त्यांना फक्त आनंद मिळतो. 

वंधत्वाची शक्यता 60 टक्क्यांनी वाढते

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, स्मोकिंगचा संबंध एक्टोपिक प्रेग्नेंसीसोबत असू शकतो. या कारणामुळेच फॅलोपियन ट्यूबमध्ये समस्या होऊ शकते. एक्टोपिक प्रेग्नेंसीमध्ये अंड गर्भाशयामध्ये पोहोचण्याआधी फॅलोपियन ट्यूबमध्ये जातात. या रिसर्चनुसार, स्मोकिंग महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची संभावना 60 टक्क्यांनी वाढवू शकतो. या कारणामुळे गर्भाशयामध्ये परिवर्तन होऊ शकतं. ज्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका आणखी वाढतो. सिगरेटमध्ये असणारं रसायन अंडाशयामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स स्तरामध्ये असंतुलन निर्माण करतात. यामुळेच पर्टिलायजेशनवर परिणाम होत असून त्यानंतर इम्प्लांटेशनमध्ये कमतरता येते. 

धुम्रपान करणाऱ्या महिलांना आईवीएफच्या दरम्यान अंडाशयाला उत्तेजित करणारी औषधं मोठ्या प्रमाणावर घेण्याची गरज भासते. याव्यतिरिक्त धुम्रपान करणाऱ्या  आईव्हीएफ रूग्णांमध्ये धुम्रपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेमध्ये धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये गर्भधारणा 30 टक्क्यांनी कमी आढळते.
 
प्रिमॅच्योर बेबी असू शकतो 

गरोदरपणामध्ये धुम्रपान करणं गर्भातील बाळासाठी हानिकारक ठरतं. एवढचं नाही तर धुम्रपान करणाऱ्या महिलांना गरोदरपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

सेकंड हॅन्ड स्मोकिंग हानिकारक 

यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या असोशिएट प्रोफेसर क्रिस्टल रिपलिंगर असं सांगतात की, हे अत्यंत आवश्यक आहे की, लोकांना या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे की, फक्त धुम्रपान केल्यानेच नाही तर धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला वावरणंही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. 'एन्वारमेंटल हेल्थ पर्सपेक्टिव' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, तंबाखूचा धूर फक्त धुम्रपान करणाऱ्यांसाठीच नाही तर नॉन स्मोकर म्हणजेच धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्याही हृदयाला धोका पोहोचवू शकतं.
 
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

Web Title: World no tobacco day 2019 smoking can increase infertility risk by 60 percent know everything about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.