World Heart Day 2018 : हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'या' 4 तपासण्या नक्की करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:04 AM2018-09-29T11:04:24+5:302018-09-29T11:27:54+5:30

World Heart Day 2018 : सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोकं हृदयासंबधिच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारंची नावं ऐकायला मिळतात.

World Heart Day 2018 : 4 medical tests everyone should go through to keep heart healthy | World Heart Day 2018 : हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'या' 4 तपासण्या नक्की करा!

World Heart Day 2018 : हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'या' 4 तपासण्या नक्की करा!

Next

World Heart Day 2018 :  सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोक हृदयासंबधीच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारांची नावं ऐकायला मिळतात. हृदय निकामी होणं, हृदयाचे ठोके अनियमित होणं, कार्डियक अरेस्ट यांसारख्या समस्यांनी अनेक लोक ग्रस्त असून अनेकांना या रोगांमुळे आपले प्राणही गमवावे लागतात. आज 29 सप्टेंबर संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हृदयासंबंधीचे आजार आणि त्याबाबतची माहिती सांगणार आहोत. कारण याबद्दलची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे.

साधारणतः वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्येच हृदयरोगाची लक्षणं दिसून येत असतं. परंतु सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्येही हृदय रोगाची लक्षणं आढळून येत असून अनेक लोक हृदय रोगांनी ग्रस्त असतात. 

हृदय रोग किंवा हार्ट अटॅकची लक्षणं -

- दिवसभर थकवा जाणवणे

- पोटदुखी, शरीरातील कोणत्याही भागात सूज येणं आणि सतत पोटाच्या समस्यांना सामोरं जाणे. 

- निद्रानाश, चिंता आणि तणाव ही सर्वात मोठी कारणं आहेत. 

- श्वास घेण्यास त्रास होणे

- सतत केस गळणे

डॉक्टरांच्या सल्यानुसार, निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारात योग्य खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर व्यायाम करणंही गरजेचं असतं. यामुळे शरीराचा हृदयरोगापासून बचाव करणं सहज शक्य होतं. परंतु त्यासाठी काही मेडिकल टेस्ट करून डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं असतं.

हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी या 4 तपासण्या करणं गरजेचं :

1. कोलेस्ट्रॉल टेस्ट
आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आढळून येतात. एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉल एमजी/डीएलमध्ये मोजण्यात येते. जर तुमच्या शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल 200 एमजी/डीएल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

2. ईकेजी टेस्ट
जर सतत छातीमध्ये दुखत असेल तर ईकेजी नावाची टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या टेस्टला ईसीजी असंही म्हणतात. या टेस्टमधये रूग्णाच्या शरीरावर छोटे छोटे इलेक्ट्रोड पॅच लावून हृदयाच्या इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यात येतात. 

3. ईसीजी/स्ट्रेस टीएमटी
ही तपासणी ईसीजीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. या टेस्टमध्ये शरीराला एखादी अॅक्टीव्हिटी देऊन थकवण्यात येतं. त्यानंतर हृदय किती ताण सहन करू शकतं, हे ईसीजी करून चेक करण्यात येतं.

4. सीटी स्कॅन
शरीराच्या अनेक अवयवांचं सीटी स्कॅन करण्यात येतं. परंतु फक्त हृदयाचं सीटी स्कॅनही करण्यात येतं. ही तपासणी करताना हृदयाची संरचना, कोरोनरी सर्कुलेशन आणि रक्त वाहिन्यांची स्थिती जाणून घेण्यात येते. 

Web Title: World Heart Day 2018 : 4 medical tests everyone should go through to keep heart healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.