World Alzheimers Day 2018 : विसरण्याच्या 'या' आजारावर या 5 पद्धतींनी मिळवा नियंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 11:25 AM2018-09-21T11:25:51+5:302018-09-21T11:27:17+5:30

अल्झायमरची लक्षणं सुरुवातीला ओळखणं कठिण असतं. रूग्णाला समजतही नाही आणि हा आजार पुर्णतः रूग्णाच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतो. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना विचार करणं, बोलणं, काम करणं यांसारख्या कामांमध्ये अडचणी येतात.

world alzheimers day control these disease | World Alzheimers Day 2018 : विसरण्याच्या 'या' आजारावर या 5 पद्धतींनी मिळवा नियंत्रण!

World Alzheimers Day 2018 : विसरण्याच्या 'या' आजारावर या 5 पद्धतींनी मिळवा नियंत्रण!

Next

(Image creadit : listindiario.com)

अल्झायमरची लक्षणं सुरुवातीला ओळखणं कठिण असतं. रूग्णाला समजतही नाही आणि हा आजार पुर्णतः रूग्णाच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतो. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना विचार करणं, बोलणं, काम करणं यांसारख्या कामांमध्ये अडचणी येतात. अशा व्यक्ती सर्वांपासून दूर राहू लागतात. या आजाराच्या सुरूवातीच्या काळामध्ये नियमित उपचार आणि औषधं यांमुळे यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

या कामांमुळे मिळवा अल्झायमरवर नियंत्रण

या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी रूग्णाने स्वतःला बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये  गुंतवून ठेवणं गरजेचं असतं. अभ्यास, वाचन, खेळ यांसारख्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टींचा आधार घेणं रूग्णांसाठी उत्तम ठरतं. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये स्वतःला सामावून घेणंही गरजेचं असतं. दररोज फिरणं आणि थोडा व्यायाम करणंही फायदेशीर ठरतं. 

हे पदार्थ अवश्य खा

बदाम आणि ड्राय फ्रुट खाण्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे फ्लॉवर खाणंही स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरातील हाडंही मजबूत होण्यास मदत होते. जर वाढत्या वयामध्ये लोकं आपली कामं स्वतः करत असतील तर त्यांना अल्झायमरचा धोका कमी असतो. अल्झायमरमध्ये मेंदूत स्त्रवले जाणारं विषारी बीटा-एमिलॉयड नावाच्या प्रोटीनच्या प्रभावाला ग्रीन टीच्या सेवनाने कमी केलं जाऊ शकतं. हिरव्या पालेभाज्या, मासे, ऑलिव्ह ऑइल अल्झायमरच्या आजाराशी लढण्यासाठी मदत करतात. 

हे पदार्थ खाणं टाळा

अल्झायमर झालेल्या व्यक्तींनी तीळ, सुकलेले टॉमेटो, भोपळा, बटर, चीज, फ्राइड फूड, जंकफूड, रेड मीट, पेस्ट्रीज आणि गोड पदार्थांचं सेवन करणं टाळावं. 

योगा आणि व्यायामाने नियंत्रण मिळवा

दररोज व्यायाम आणि योगा केल्यामुळे अल्झायमरच्या प्रभावाला कमी केलं जातं. मेडिटेशन केल्यामुळे विसरण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी सर्वांगासन करा. याशिवाय इतर आसनंही शरीराला सुदृढ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

Web Title: world alzheimers day control these disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.