मेहनत करूनही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यात अपयशी होताय? मग 'हे' वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:35 PM2018-08-20T13:35:54+5:302018-08-20T13:37:03+5:30

तरूणांमध्ये सलमान खान, ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसारखी बॉडी बनवण्याचं क्रेझ असतं. त्यांच्यासारखे 'सिक्स पॅक अॅब्स' असावे अशी प्रत्येक तरूणांची इच्छा असते.

workout mistakes you need to stop making in gym if you want to six pack abs | मेहनत करूनही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यात अपयशी होताय? मग 'हे' वाचाच!

मेहनत करूनही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यात अपयशी होताय? मग 'हे' वाचाच!

googlenewsNext

तरूणांमध्ये सलमान खान, ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसारखी बॉडी बनवण्याचं क्रेझ असतं. त्यांच्यासारखे 'सिक्स पॅक अॅब्स' असावे अशी प्रत्येक तरूणांची इच्छा असते. त्यासाठी अनेक तरूण जीम, हेवी डाएट आणि प्रोटीन्सचा आधार घेतात. पण मेहनत करूनही अनेकांना यात यश मिळत नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की, जिममध्ये घाम गाळल्यानं किंवा वेगवेगळे प्रोटीन्स किंवा सप्लिमेंट्स घेतल्यानं तुम्ही सिक्स पॅक अॅब्स बनवू शकता तर तुम्ही चुकीचा विचार करताय. सिक्स पॅक अॅब्स बनवण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी फिटनेस एक्सपर्ट इमरान खान काही टिप्स सांगत आहेत. जाणून घेऊयात काही टिप्स...

1. क्रंच अॅन्ड सिट-अप्स

या दोन्ही एक्सरसाइझ अॅब्स बनवण्यासाठी फायदेशीर नाहीत. त्यामुळे यांव्यतिरिक्त स्टॅडिंग क्रंच, साइड बेंड्स आणि नी रायझेस यांसारख्या एक्सरसाइझ कराव्यात. त्यामुळे तुम्हाला सिक्स पॅक अॅब्स बनवण्यास मदत होईल.

2. अॅब्ज वर्कआउट

दररोज अॅब्ज वर्कआउट करत असाल तर असं करू नका. कारण मसल्सना रिकव्हर आणि रिबिल्ड होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रोज एकसारख्या एक्सरसाइझ न करता, वेगवेगळ्या  एक्सरसाइझ करणं फायदेशीर ठरेल.

3. एकाच प्रकारची एक्सरसाइझ

बऱ्याचदा जिममध्ये गेल्यावर तरूण एकाच प्रकारच्या एक्सरसाइझ रोज करतात. असं केल्यामुळे मसल्स बनत नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइझ करताना मेडिसिनल बॉल किंवा डम्बेल्सचाही वापर करणं गरजेचं आहे. 

4. फूड्स

अनेक लोकांचा असा समज असतो की, जास्त फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यानं चरबी कमी करण्यास मदत मिळते. पण हा गैरसमज आहे. हे अगदी योग्य आहे की, फायबर असलेले पदार्थ शरीराचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. परंतु, यामुळे अॅब्स बनवण्यास मदत मिळत नाही. 

5. सप्लीमेंट्स

जर तुम्ही असा विचार करत असाल की, अॅब्स बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेणं शॉर्टकट आहे. तर हा तुमचा गैरसमज आहे. अॅब्स बनवण्यासाठी तुम्हाला हार्ड ट्रेनिंग, प्रॉपर डाएट आणि रेस्टची गरज असते.  

Web Title: workout mistakes you need to stop making in gym if you want to six pack abs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.