Women working more than nine hours are at risk of getting depression | 'या' कारणामुळे महिलांमध्ये वाढतीये डिप्रेशनची समस्या!
'या' कारणामुळे महिलांमध्ये वाढतीये डिप्रेशनची समस्या!

(Image Credit : www.shrm.org)

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:साठी वेळच काढू शकत नाहीत. पुढे जाण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून अनेकजण ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या महिला ९ तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात त्यांना डिप्रेशनचा धोका अधिक असतो. 

जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अ‍ॅन्ड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, ज्या महिला एका आठवड्यात ५५ तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांना डिप्रेशनचा धोका ७.३ टक्क्यांनी जास्त वाढतो. तेच जर महिलांनी एका आठवड्यात ३५ ते ४० तास काम केलं तर त्या फिट आणि तणावमुक्त राहतात. 

या रिसर्चचे मुख्य गिल वेस्टन सांगतात की, 'आम्ही आमच्या रिसर्चचे परिणाम फार जास्त विस्तारात तर नाही सांगू शकत. पण आम्हाला आढळलं की, महिला केवळ त्यांच्या ऑफिसमध्येच काम करतात असं नाही तर त्यांना घरातीलही कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांचे काम करण्याचे तास वाढतात'.

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या महिला विकेंडला सुद्धा काम करतात, त्या जास्त सर्व्हिस सेक्टरमधील असतात आणि त्यांचा पगारही इतरांच्या तुलनेत कमी असतो. अर्थातच पगार कमी असेल तर व्यक्तीवरील तणाव वाढतो आणि नंतर त्या डिप्रेशनच्या शिकार होतात. 
हा रिसर्च करण्यासाठी ११ हजार २१५ पुरूष आणि १२ हजार १८८ महिलांचा समावेश करण्यात आला होता. रिसर्चनुसार, विकेंडला काम करावं लागत असल्याने पुरूष आणि महिला दोघांमध्येही डिप्रेशन येतं. पण महिलांचं डिप्रेशन हे ४.६ टक्क्यांनी जास्त असतं. 

याबाबतचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आकडेवारी सुद्धा फार उत्साहजनक नाहीये. या आकडेवारीनुसार, ३०० मिलियनपेक्षा जास्त लोक डिप्रेशनने पीडित आहेत. २०१६ ते १७ दरम्यान एकट्या भारतात ३६ टक्के लोक डिप्रेशनने ग्रस्त होते. तसेच हे प्रमाण कामाच्या वाढत्या ताणामुळे अधिक वाढताना दिसत आहे. 


Web Title: Women working more than nine hours are at risk of getting depression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.