पुरुषांमध्ये का वाढत आहे थायरॉइडची समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:11 AM2019-04-18T10:11:40+5:302019-04-18T10:14:38+5:30

अनेकजण असा विचार करतात की, थायरॉइड ही समस्या केवळ महिलांनाच होते, पण असं अजिबात नाहीये. पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो.

Why is the problem of thyroid increasing in men too | पुरुषांमध्ये का वाढत आहे थायरॉइडची समस्या?

पुरुषांमध्ये का वाढत आहे थायरॉइडची समस्या?

googlenewsNext

जर तुमचं वजन अचानक वाढू लागलं असेल, इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि लैंगिक जीवनातील स्वारस्य कमी झालं असेल तर तुम्ही थायरॉइडने ग्रस्त झाल्याची शक्यता आहे. ही ती लक्षणे आहेत जी थायरॉइडने ग्रस्त पुरुषांमध्ये बघायला मिळतात. अनेकजण असा विचार करतात की, थायरॉइड ही समस्या केवळ महिलांनाच होते, पण असं अजिबात नाहीये. पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. मध्यम वयात पुरुषांना याचा अधिक धोका असतो. 

केवळ महिलांना नाही होत थायरॉइड

(Image Credit : Keck Medicine of USC)

आतापर्यंत ज्या केसेस समोर येत होत्या त्यावरुन एक अशी धारणा तयार झाली होती की, थायरॉइड केवळ महिलांना होऊ शकतो. पण आता जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार, गेल्या काही वर्षात पुरुषांमध्येही या आजाराचं प्रमाण वाढलं आहे. पण पुरुषांना हा आजार होण्याचा धोका महिलांपेक्षा ८ टक्क्यांनी कमी असतो. तरी सुद्धा मध्यम वयातील पुरुषांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. 

ही असू शकतात लक्षणे

थायरॉइड झाला असेल तर व्यक्तीचं वजन अचानक वाढू लागतं आणि थकवा व कमजोरी अधिक जाणवू लागते. त्यासोबतच काही अशीही लक्षणे आहेत जी महिलांमध्ये नसतात. जसे की, मांसपेशींमध्ये कमजोकी, इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि कामेच्छा कमी होणे.

आनुवांशिका असू शकते समस्या

महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही ही समस्या आनुवांशिक असू शकते. त्यामुळे जर तुमच्या कुटूंबात आधीच जर कुणी थायरॉइडने ग्रस्त असतील तर तुम्हालाही हा आजार होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला थायरॉइडशी संबंधित कोणतही लक्षण दिसलं तर उशीर न करात वेळीच टेस्ट करावी. थायरॉइडसाठी टीएसएच, फ्री टा४ आणि थायरॉइड पेरोक्सीडेज अॅंटीबॉडीज अशा टेस्ट आहेत, ज्याने थायरॉइडच्या ग्रंथींमध्ये झालेली गडबड माहीत होते. 

(Image Credit : Medical News Today)

काय आहे कारण?

सामान्यपणे थायरॉइड अधिक वय असलेल्या लोकांनाच होतो, पण पुरुषांमध्ये याचे अपवादही बघायला मिळतात. खराब जीवनशैलीमुळे तुम्ही कोणत्याही जीवनशैलीमध्ये या आजाराचे शिकार होऊ शकता. त्यामुळे हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करणे गरजेचे आहे. जास्त स्ट्रेस असल्याकारणाने एड्रेनल ग्लॅंड योग्यरितीने काम करु शकत नाही, ज्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसोलचं प्रमाण अधिक वाढतं. याचा थेट प्रभाव थायरॉइड ग्लॅंडवर पडतो. 

काय करावे उपाय

थायरॉइड रोखला जाऊ शकत नाही. पण याच्या लक्षणांना ओळखून सुरुवातीलाच उपचारात मदत मिळू शकते. शरीरात थायरॉइड हार्मोन स्तर कमी होणे म्हणजे हायपोथायराडिज्म आणि जास्त होण्याचा अर्थ हायपरथायरायडिज्म होतो. 

१) कमी आयोडिन - रोज १५० मायक्रोग्रॅम आयोडिनची गरज असते. आयोडिनचं प्रमाण कमी झाल्याने हायपोथायरायडिज्म आणि जास्त झाल्याने हायपरथायरायडिज्मचा धोका होऊ शकतो. 

२) वय वाढणे - वाढत्या वयासोबतच इम्युनिटी सिस्टम सुद्धा कमजोर होऊ लागतं आणि शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे ३५ वय झाल्यावर थायरॉइड प्रोफाइस टेस्ट आवर्जून करावी.

(Image Credit : Healthline)

३) औषधे - इंटरफेन आणि कॅन्सरच्या उपचारासाठी घेतली जाणारी रेडिएशन थेरपी इत्यादीने थायरॉइड ग्लॅंडवर प्रभाव पडतो. त्यामुळे थायरॉइड टेस्ट करण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. 

४) तणाव - जास्त स्ट्रेस असल्याने शरीरात हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे तुम्हाला थायरॉइडचा धोका होऊ शकतो. याचा सामना करण्यासाठी एक्सरसाइज आणि योग्याभ्यास करत रहावा.

Web Title: Why is the problem of thyroid increasing in men too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.