जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:14 PM2019-04-21T15:14:06+5:302019-04-21T15:21:03+5:30

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये सध्या प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.  अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे.

What is the right side of aluminium foil | जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या

जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या

googlenewsNext

(Image Credit : lifealth.com)

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये सध्या प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.  अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच, प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. आताच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे जेवण बनवण्याची पद्धत आणि ते पॅक करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडून आले आहेत. आधी जे आपण कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये पदार्थ पॅक करत होतो. तेच आता अ‍ॅल्युमिनिअमच्या फॉइल पेपरमध्ये पॅक केलं जातं. अनेकदा जेवण शिजवताना किंवा मांसाहारी पदार्थ ग्रिल्ड करताना फॉईल पेपरचा वापर करण्यात येतो. किचनमध्ये गरम पदार्थ रॅप करण्यासाठी किंवा फ्रिजमध्ये काही पदार्थ ठेवण्यासाठी फॉइल पेपरचा वापर करण्यात येतो.  पण तुम्ही फॉइल पेपर नीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, पेरपरच्या दोन्ही बाजू वेगवेळ्या असतात. एक बाजू चमकदार आणि एक बाजू कमी चमकदार असते. पदार्थ पॅक करताना लोक कसेही पदार्थ पॅक करतात. 

आता प्रश्न हा आहे की, या फॉइल पेपरचीही कोणती योग्य आणि अयोग्य बाजू असते का? काही लोकांचं असं म्हणणं आहे की, फॉइल पेरपरची जी चमकदार बाजू असते. त्यावर पदार्थ पॅक केल्याने पदार्थ जास्त वेळ थंड किंवा गरम राहतात. पण खरं तर तुम्ही फॉइल पेपरच्या कोणत्याही बाजूला पदार्थ पॅक केल्याने काही फरक पडत नाही. 

फॉइल पेपरच्या मॅन्युफॅक्चरिंगमुळे याची एक बाजू जास्त चमकदार आणि एक बाजू कमी चमकदार असते. त्यामुळे कोणत्याही बाजूने पदार्थ पॅक केले तरिही काही फरक पडत नाही. तसं काही लोकांची अशी समजूत असते की, फॉइल पेपरमध्ये पदार्थ पॅक करणं आरोग्यासाठी धोकादायक असतं. जर तुम्हालाही असचं वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. 

शरीरासाठी घातक असतो फॉईल पेपर - 

अ‍ॅल्युमिनिअम फॉइलमध्ये जेवण बनवणं किंवा पॅक करणं आरोग्यासाठी घातक असतं. संशोधनातून या गोष्टींचा खुलासाही करण्यात आला आहे की, अ‍ॅल्युमिनिअम मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. ज्या लोकांना हाडांसंबंधीत आजार आधीपासूनच असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत घातक ठरतं. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, फॉईल पेपरमध्ये शिजवलेले अन्नपदार्थ गरजेपेक्षा जास्त अ‍ॅल्युमिनिअम खेचून घेतात. काही संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जर आपल्या शरीरामध्ये अ‍ॅल्युमिनिअमची मात्रा अधिक झाली तर त्याचा गंभीर परिणाम हा आपल्या मेंदूवर होतो. यामुळे मेंदूमधील पेशींची वाढ खुंटते आणि काही गोष्टींचा विसर पडणे, विचार करण्याची शक्ती कमजोर होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. 

शरीरामध्ये अ‍ॅल्युमिनिअमची मात्रा वाढली तर हाडं कमजोप होणं, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे अल्जायमर सारख्या विसरण्याच्या आजाराचं मूल कारणही अ‍ॅल्युमिनिअमच आहे. 

उपाय -

- फॉईल पेपरमध्ये जास्त गरम खाद्यपदार्थ पॅक करू नयेत. 

- खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी चांगल्या क्वॉलिटिच्या फॉईल पेपरचा वापर करावा.

- अ‍ॅसिडीक खाद्यपदार्थ फॉईल पेपरमध्ये पॅक करू नयेत. त्यामुळे पदार्थ लवकर खराब होत असून त्यांच्यातील केमिकल बॅलेन्स बिघडतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: What is the right side of aluminium foil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.