स्मार्टफोनच्या सवयीपासून कशी कराल सुटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 11:53 AM2019-06-11T11:53:34+5:302019-06-11T11:57:29+5:30

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बरच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का?

What is nomophobia how to get rid of mobile phone addiction | स्मार्टफोनच्या सवयीपासून कशी कराल सुटका?

स्मार्टफोनच्या सवयीपासून कशी कराल सुटका?

googlenewsNext

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बरच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का? मोबाइलची बॅटरी कमी असली किंवा संपत आली तर तुम्ही अस्वस्थ होता का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हे नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे. आता तुम्ही म्हणाल यात काळजी करण्यासारखं काय? मोबाइलची सवय झाली असेल म्हणून असं होत असावं... पण नाही तुमच्या याच सवयी एका आजाराचं कारण ठरू शकतात. 

भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या सवयीचा दर गरजेपेक्षा जास्त वाढत आहे. यामुळेच तरूणाई 'नोमोफोबिया' नावाच्या आजाराने ग्रस्त होत आहे. जवळपास तीन पिढ्या सतत एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर करत आहेत आणि आपला 90 टक्के दिवस उपकरणांसोबतच घालवतात. ही बाब एडोबमधील एका अध्ययनामधून स्पष्ट झाली आहे. 

संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांमधून समोर आल्यानुसार, 50 टक्के वापरकर्ते मोबाइलवर काम सुरू करतात आणि लगेच कंम्युटर स्क्रिनसोमर जाउन बसतात. भारतामध्ये अशाप्रकारे काही वेळातच स्क्रिन स्विच करणं एक साधारण गोष्ट आहे. मोबाइल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणं, डोळे कोरडे होणं, कंप्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचं कारण बनतात. 20 ते 30 वर्षांच्या वयोगटातील जवळपास 60 टक्के तरूणांना आपला मोबाइल फोन विसरण्याची भिती असते. यालाच नोमोफोबिया असं म्हणतात. 

30 टक्के प्रकरणांमध्ये स्मार्टफोन मुलांसाठी संघर्षाचं कारण ठरतात. अनेकद मुलं उशीरा उठतात आणि त्यामुळे कधी कधी शाळेला सुट्टी देखील घेतात. अनेक लोक रात्री झोपायला गेल्यानंतर अंथरूणातच 30 ते 60 मिनिटांचा वेळ मोबाइलवरच काहीतरी करत असतात. 

नोमोफोबिया कसा ओळखावा ?

1. फोनच्या वापरामुळे तुमचा बहुमुल्य वेळ वाया जात असेल. 

2. तुमच्या वागण्या-बोल्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते. इंग्लंडमधील एका सर्वेक्षणानुसार 51 टक्के लोकांना एक्स्ट्रीम टेक अ‍ॅन्झायटी म्हणजे स्मार्टफोनपासून दूर झाल्यास येणारी अस्वस्थता होती.

3. फोनच्या अतिरेकी वापरामुळे तुमची झोप बिघडते, तुम्हाला झोप कमी येते किंवा सतत झोपमोड होते.

स्मार्टफोनची सवय सोडवण्यासाठी काही खस टिप्स : 

  • झोपण्यापुर्वी एक तासभर आधी तरी तुमचा फोन वापरणे बंद करा. व्हायब्रेशन्स, ब्लिंक होणारे लाइटस आणि आवाज तुम्हाला झोप येऊ देत नाही. आता दिवसभराचे काम संपले आहे याची जाणिव मेंदूला होण्यासाठी फोन बंद करणे गरजेचे आहे अन्यथा मेंदूला विश्रांतीची संधीच मिळणार नाही.
  • प्रत्येक तीन महिन्यांमधून 7 दिवसांसाठी फेसबुकचा वापर करू नका.
  • गरज नसेल तर रात्रभर फोन बंद करणे कधीही चांगलेच. फोन बंद केला आणि काहीतरी चांगले-वाईट जगात घडले तर ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे. कोणतीही बातमी पोहचण्यात आता अडथळा येत नाही. प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. किंवा तुमच्या मित्रांच्या फेसबूक किंवा टष्ट्वीटरवर आपण रिअ‍ॅक्ट झालो नाही तर आकाश कोसळेल अशी भीती मनातून काढून टाका. मोबाइल फोन नसताना आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ फिरायला जाण्यास, खेळायला, व्यायामाला, जेवायला, वाचायला मिळणारा वेळ आठवून पाहा.
  • आठवड्यातून एखादा दिवस सोशल मीडियापासून दूर राहा. 
  • घरातून बाहेर असतानाच मोबाइलचा वापर करा.
  • घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा. वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरायचा नाही. लहान मुलांपासून फोन दूर ठेवा.
  • नवे छंद किंवा नवी आवड जोपासण्याचा प्रयत्न करा. वाचन, बागकाम, घरकाम तुम्हाला फोनपासून दूर ठेवेल. घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वत: तेथे जाऊन बोला, तेथे चॅटिंगचा वापर टाळा.
  • एका दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका.
  • तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य जपण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, मॉडरेशन. याचाच अर्थ तंत्रज्ञानाचा समजुतदारपणाने उपयोग करणं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: What is nomophobia how to get rid of mobile phone addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.