तुमच्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’चा समावेश किती आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:11 PM2018-01-15T15:11:22+5:302018-01-15T15:12:01+5:30

दुर्लक्ष कराल, तर आरोग्याच्या समस्यांचा करावा लागेल सामना..

 What is the intake of vitamins 'C' in your diet? | तुमच्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’चा समावेश किती आहे?

तुमच्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’चा समावेश किती आहे?

ठळक मुद्देलिंबूवर्गीय फळांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून असायला हवा.क जिवनसत्त्वांचा समावेश आपल्या आहारात नसल्यास काही विशिष्ट प्रकारचे जिवाणू आपल्या शरीरावर हल्ला चढवतात.आपली त्वचा, हाडं, सांधे, लिगामेण्ट्स, दात.. यासारख्या अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो.

- मयूर पठाडे

अनेक गोेष्टींची आपण काळजी घेतो, अलीकडे तब्येतीच्या बाबतीत तर आपण खूपच जागरूक झालो आहोत, पण जागरुक झालो आहोत म्हणजे नेमकं काय? खरंच आपल्याला त्यासंदर्भात काय काळजी घ्यायची हे पूर्णपणे माहीत झालं आहे का? आरोग्यासंदर्भातली आपली जाणीव वाढली आहे, हे मान्य, पण नेमकं काय करायचं याबाबतीत सावळा गोंधळच आहे.
साधी गोष्ट व्हिटॅमिन आणि मिनरल्सची. आपल्या शरीराला या गोष्टींची किती आवश्यकता आहे आणि त्यांचं महत्त्व काय, आहारात त्याचा नेमका किती समावेश असावं याबाबतीत आपण तसे अंधारातच असतो.
साधी गोष्ट व्हिटॅमिन सी ची, पण हे व्हिटॅमिन सीही आपण पुरेसं घेत नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींना आपल्याला सामोरं जावं लागतं असं संशोधकांचं, अभ्यासकांचं म्हणणं आहे.
कोणताही ऋतु असो, व्हिटॅमिन सीचा समावेश आपल्या आहारात असायलाच हवा. विशेषत: हिवाळा आणि उन्हाळ्यात तर त्याची जरा जास्तच आवश्यकता आपल्याला असते.
लिंबूवर्गीय फळांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून असायला हवा. क जिवनसत्त्वांचा समावेश आपल्या आहारात नसल्यास काही विशिष्ट प्रकारचे जिवाणू आपल्या शरीराची वाट लावतात.
रोज किती पाणी प्यायचं याबाबत मतभेद असले तरी तहान लागण्याच्या जाणीव होण्याआधीच पाणी प्यायला पाहिजे हे सूत्र आपण पाळूच शकतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवायलाच हव्यात.
आपली त्वचा, हाडं, सांधे, लिगामेण्ट्स, दात.. यासारख्या अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

Web Title:  What is the intake of vitamins 'C' in your diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.