वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 05:02 PM2018-05-16T17:02:06+5:302018-05-16T17:02:06+5:30

अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...

Ways to beat hunger and lose weight in Marathi | वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल

वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल

Next

(Image Credit: receitas-online.net)

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भूकेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. वजन घटवण्याच्या नादात उपास मार केली जाते. त्यातून अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...

आरोग्यदायी फॅट्सचा आहार वाढवा

अनेकजण फॅटयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश कमी करतात. परंतु फॅट्समुळेच भूकेवर नियंत्रण ठेवता येतं. फॅट्समधून उर्जा मिळते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण सुधारते. पेशींना मजबूत बनवते. त्यामुळे बदाम, अ‍ॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात समावेश करा.

फायबर्सचा आहार वाढवा

पचनक्रियेला नियमित करण्यासाठी फायबर्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे पाण्याचा अंश टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात हिरव्या भाज्यांचा,फळांचा समावेश वाढवा. त्यामध्ये कॅलरीजही योग्य प्रमाणात आढळतात. सलाड किंवा फळं खाण्याच्या सवयीमधून शरीराला फायबर्सही मिळतात.

प्रोटीन्सचा आहार वाढवा

तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश वाढवा. यामुळे आहार पोटभरीचा होतो तसेच त्यातील अमायनो अ‍ॅसिड भूक नियमित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी अख्या डाळी, मासे, अंडी, यांचा आहारातील समावेश वाढवा.

भूक लागल्यावर च्युईंगम चघळा

वेळी अवेळी  लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी च्युईंग गम चघळणे हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. यामुळे वजन कमी होत नसले तरीही कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात. मात्र च्युईंगगम हे शुगर फ्री असेल याची काळजी घ्या.
 

Web Title: Ways to beat hunger and lose weight in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.