Want to stay away from Alzheimer proper rest and deep sleep is necessary | चांगली झोप घेतल्याने दूर राहणार अल्झायमर - रिसर्च
चांगली झोप घेतल्याने दूर राहणार अल्झायमर - रिसर्च

एका नव्या शोधानुसार जे वयोवृद्ध कमी झोप घेतात आणि ज्यांच्या मेंदूमध्ये ताऊ प्रोटीनचं प्रमाण कमी होतं, त्यांना कुणाला ओळखण्यास अडचण येत असेल तर हे अल्झायमरची लक्षणे आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासकांनी सांगितले की, चांगली झोप घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती मजबूत असते आणि झोपून उठल्यावर त्यांना फ्रेश वाटतं.

सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिन नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार तरुणावस्था आणि त्यानंतरच्या काळात पुरेशी झोप न घेणे मेंदूच्या आरोग्यत मोठी कमतरता येण्याचा संकेत आहे. वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटी ब्रेंडन लूसी म्हणाल्या की, चांगली झोप ने घेणे सामान्य आणि खराब मानसिक स्वास्थ्या दरम्यामन संकेताचं काम करते. आम्हाला हे आढळलं की, लोकांमध्ये झोपेमुळे स्मरणशक्तीच्या समस्या होऊ लागतात आणि नंतर ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त होतात. 

या कारणानेही होतो हा आजार

अभ्यासकांचं मत आहे की, जास्तीत जास्त लोकांमध्ये अल्झायमर आनुवांशिक, जीवनशैली आणि पर्यावरण या कारणांमुळे होतो. या गोष्टींमुळे मेंदू काळानुसार प्रभावित होतो. अल्झायमर आजाराचं मुख्य कारण स्पष्ट नाहीये, पण जास्तीत जास्त ही समस्या आनुवांशिक आढळते. मेंदूवर याचा काय परिणाम होतो हेही अजून स्पष्ट नाहीये. 

अल्झायमरची लक्षणे

अल्झायमर (Alzheimer's Disease)  हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते. 

१) स्मरणशक्ती कमी होणे

नाव विसरणे, वस्तू हरवणे, ठरवलेल्या गोष्टी विसरणे, शब्द लक्षात न ठेवू शकणे, गोष्टी शिकण्यात आणि त्या लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होणे या सामान्य बाबी असतात. या आजाराने तुमची पूर्ण स्मरणशक्ती पुसली जाऊ शकते. त्यासोबतच तुम्ही कुणालाही ओळखू शकणार नाहीत. 

२) कोणत्याही गोष्टीचा निर्णय न घेऊ शकणे

हा आजार झाला असेल तर तुमची निर्णय क्षमता कमी होते. पर्यायांमधून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय घेताना अनेक अडचणी तुम्हाला येऊ शकतात. 

३) शारीरिक ताळमेळ बसवण्यात समस्या

शरीरावर नियंत्रण न राहिल्याने तुम्ही पडूही शकता किंवा जेवण तयार करणे, ड्रायव्हिंग करणे, घरातील इतर कामे करतांना तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. आजार जास्तच वाढला असेल तर तुम्ही रोजची कामे जसे की, आंघोळ करणे, कपडे परिधान करणे, तयार होणे, जेवण करणे, टॉयलेटला जाणे यांसारखी कामे कुणाच्याही मदतीशिवाय करु शकणार नाहीत.  

४) बोलण्यात अडचण

हा आजार तुम्हाला झाला असेल तर तुम्ही एकही भाषा नीट बोलू शकणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटतं ते शब्दात व्यक्त न करता येणे किंवा लिखित अक्षरे समजण्यासही अडचण होऊ शकते. 

५) व्यक्तिमत्वात बदल

तुम्ही विनाकारण आक्रामक होऊ शकता किंवा चिंतेत राहू शकता. हा आजार झाल्यावर तुम्ही तसे सामान्य व्यक्तीच असता पण तुमच्या व्यक्तिमत्वात अचानक बदल होतो. आणि जसेही तुम्ही यातून बाहेर येता तेव्हा पुन्हा शांत व्यक्ती होता. 


Web Title: Want to stay away from Alzheimer proper rest and deep sleep is necessary
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.