'या' एका गोष्टीमुळेही होऊ शकतो कर्करोगापासून बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:59 AM2019-01-12T10:59:29+5:302019-01-12T11:03:45+5:30

कर्करोग हा किती घातक आजार आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा शरीरात पेशींचा असामान्य विकास होतो, तेव्हा कर्करोग म्हणजेच कॅन्सर होतो.

Want to avoid cancer then boost your immune system | 'या' एका गोष्टीमुळेही होऊ शकतो कर्करोगापासून बचाव!

'या' एका गोष्टीमुळेही होऊ शकतो कर्करोगापासून बचाव!

Next

कर्करोग हा किती घातक आजार आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा शरीरात पेशींचा असामान्य विकास होतो, तेव्हा कर्करोग म्हणजेच कॅन्सर होतो. स्तनांचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, कोलन, प्रोस्टेट असे मिळून १०० पेक्षा अधिक कर्करोगांचे प्रकार आहेत. यावर सर्जरी, रेडिएशन आणि कीमोथेरपी असे उपचार होत आहेत. पण शरीरातील मजबूत इम्यून सिस्टीम म्हणजेच मजबूत रोगप्रतिकारक शक्ती यावरील उपचाराचा चौथा महत्वाचा भाग मानला जात आहे.  

अमेरिकेतील जेम्स पी एलिसन आणि जपानचे तासुकू होन्जो यांच्यानुसार, आपल्या शरीराची इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीही कर्करोगाची लढू शकते. याने कर्करोगासाठी नवे दरवाजे उघड झाले आहेत. रिसर्चनुसार, शरीराच्या इम्यून सिस्टीममध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. जर तुम्हाला वाटत असेल की, कर्करोगापासून तुमचा बचाव झाला पाहिजे, तर सर्वातआधी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यावर भर द्यावा. 

डॉ. एलिसन आणि होन्जो वेगवेगळं काम करत १९९० मध्ये हे सिद्ध केलं होतं की, कशाप्रकारे शरीरात असलेले काही प्रोटीन इम्यून सिस्टीमच्या टी-सेलवर 'ब्रेक' लावण्याचं काम करतात. त्यांना कर्करोगांच्या पेशींसोबत लढण्यास रोखतात. असे प्रोटीन निष्क्रिय करुन त्या पेशींची कर्करोगाशी लढण्याची क्षमता वाढवली जाऊ शकते. अशाप्रकारे आपलं शरीरच स्वत: औषध होऊ शकतं. 

रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?

१) व्हिटॅमिन सी हृदय रोग, प्रसुतीपूर्व समस्या, डोळ्यांची समस्या आणि त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्याही दूर करण्यास मदत करतं. याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाते. असे मानले जाते की, व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यास फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी शिमला मिरची आणि आंबट फळांचं सेवन करु शकता. 

२) ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. हे एक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि फायबरने भरपूर अशी भाजी आहे. याचा तुम्ही आहारात समावेश करायला हवा. याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

३) लसूण जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाचे शरीराला अनेक फायदे आहेत. फार पूर्वीपासून लसणाचा वापर संक्रमणापासून बचाव करण्यासाठी केला जातो. लसणाच्या सेवनाने रक्तदाब कमी करण्यास मदत मिळते आणि रक्त गोठण्याची समस्याही होत नाही. यात असलेल्या एलिसिनमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 

४) तसंच आलं सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं. शरीरातील सूज कमी करण्यास आलं फायदेशीर असतं. तसेच घशात होणारी खवखवही याने दूर होते. तसेच याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 

५) हळदीमध्ये असलेल्या तत्वही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यासोबतच शोधातून समोर आलं आहे की, हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. 

६) दही व्हिटॅमिन डी चं स्त्रोत आहे. व्हिटॅमिन डी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. 
 

Web Title: Want to avoid cancer then boost your immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.