चप्पल न वापरता चालण्याचे फायदे, 'या' समस्यांपासून मिळेल सुटका! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 10:30 AM2019-01-11T10:30:26+5:302019-01-11T10:32:15+5:30

सतत तणावात राहणे ही सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांसाठी एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेकजण यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची मदत घेतात.

Walking barefoot reduces stress, know the benefits | चप्पल न वापरता चालण्याचे फायदे, 'या' समस्यांपासून मिळेल सुटका! 

चप्पल न वापरता चालण्याचे फायदे, 'या' समस्यांपासून मिळेल सुटका! 

googlenewsNext

(Image Credit : antranik.org)

सतत तणावात राहणे ही सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांसाठी एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेकजण यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची मदत घेतात. पण प्रत्येक उपायाने फायदा होतोच असे नाही. पण या उपायांमध्ये एक उपाय फारच फायदेशीर मानला जातो. तो म्हणजे चप्पल न घालता मोकळ्या पायांनी चालणे. तणावातून सुटका मिळवण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. तुमच्या एक लक्षात आलं असेल की, जुन्या काळात लोक फार कमी चपला वापरत होते. ते चप्पल न घालताच चालत होते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहत होतं. त्यामुळे आम्हीही तुम्हाला चप्पल न घालता पायी चालण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. 

काय होतात फायदे?

गवत, रेती आणि मातीवर चप्पल, शूज न घालता चालणे वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. हा एकप्रकारचा चांगला व्यायामच आहे. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, आपल्या शरीराची रचना ही बायो-इलेक्ट्रिकल असते, जी आपल्या शरीरातील पेशींना, तंत्राला एकप्रकारे ऊर्जा देण्याचं काम करते. जमिनीचं ऊर्जा चक्र शरीराच्या विद्युत तंत्राला आपल्याकडे आकर्षित करुन प्रतिकूल-अनुकूल प्रभाव टाकते. ज्यामुळे आपल्या आरोग्यात सुधारणा होते. आपल्या मेंदूची गतीविधी वाढते. त्यासोबतच याने आपल्या शरीरात अॅंटी-ऑक्सिडेंट स्तरही वाढतो, रक्तप्रवाह सुधारतो, तणाव आणि सूजही कमी होण्यास मदत मिळते. अशात पृथ्वीच्या ऊर्जेशी कनेक्ट होण्यासाठी चप्पल न घालता चालणे फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. 

काय सांगतात शोध?

वेगवेगळ्या शोधांनुसार, हे तथ्यही समोर आलं आहे की, मोकळ्या पायांनी चालणे किंवा चप्पल न घालता चालण्याने जमिनीतील ऊर्जा संपूर्ण शरीरात संचारित होते आणि पायांचा दबाव जमिनीवर पडल्याने मांसपेशी सक्रिय होतात. याने सांधेदुखी, तणाव, झोप न येणे आणि हृदयासंबंधी समस्या दूर होतात. जर तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका हवी असेल तर रोज अर्धा तास गवत, माती आणि रेतीवर चप्पल न घालता चाला.

हेही होतात फायदे

- पायांच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच असे केल्याने पायांना भरपूर ऑक्सिजन मिळतं. रक्तप्रवाह चांगला होऊन गुडघे आणि पाय मजबूत होतात. त्यामुळे थकवाही कमी होतो. 

- असं नियमीत केल्याने पायांमध्ये झालेले ब्लॉकेज किंवा गाठीही ठिक होतात. 

- डोकेदुखी, खांदेदुखी आणि गुडघ्यांचं दुखणं दूर होतं. तसेच पायांमध्ये लवचिकता आणि गतिशीलता येते. 

- मोठ्यांसाठी चप्पल न वापरता काही वेळ चालणे शरीरात संतुलन कायम करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. 

- चप्पल न घालता मांसपेशींची ताकद वाढते. 

अशी काळजी घ्यावी

वाढत्या वयाच्या कारणाने मांसपेशी कमजोर होऊ लागतात. पायांच्या मासपेशी शिथिल झाल्या कारणाने चालण्या-फिरण्यात अडचण येते. अशावेळी दगड पायांना रुतू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही लॉनमध्ये चप्पल न घालता चालत असाल तर आधी ते स्वच्छ करुन घ्या. गरमीच्या दिवसात गरम फरशीवर चालू नये. 

Web Title: Walking barefoot reduces stress, know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.