'या' व्हिटॅमिनमुळे कमी होतं वजन, वाचून लगेच व्हिटॅमिनच्या शोधात पळाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:03 AM2019-06-24T10:03:04+5:302019-06-24T10:12:04+5:30

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि डाएटकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेकांना व्हिटॅमिन कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतोय.

Vitamin N control obesity know other health benefits | 'या' व्हिटॅमिनमुळे कमी होतं वजन, वाचून लगेच व्हिटॅमिनच्या शोधात पळाल!

'या' व्हिटॅमिनमुळे कमी होतं वजन, वाचून लगेच व्हिटॅमिनच्या शोधात पळाल!

Next

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि डाएटकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेकांना व्हिटॅमिन कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतोय. कोणत्याही प्रकारचं व्हिटॅमिन जर शरीरात कमी झालं जर त्या लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिनपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन एन(N) असतं. हे व्हिटॅमिन कमी झालं तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. शरीरात जर व्हिटॅमिन एनचं योग्य प्रमाण असेल तर अस्थमा आणि हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका कमी असतो. तसेच व्हिटॅमिन एनच्या सेवनाने लठ्ठपणाही कमी होतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे व्हिटॅमिन घ्यायला हवं.

(Image Credit : TreeHugger)

शरीरात जर व्हिटॅमिन एन योग्य प्रमाणात राहिलं तर हृदय आणि फुप्फुसासंबंधी आजार होत नाहीत किंवा या आजारांचा धोका कमी राहतो. पण हे व्हिटॅमिन शरीराला शुद्ध वातावरण आणि निसर्गातून मिळतं. चला जाणून घेऊ व्हिटॅमिन एनमुळे कोणकोणत्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो.

अस्थमापासून बचाव

(Image Credit : Medical News Today)

व्हिटॅमिन एन जर तुम्ही योग्य प्रमाणात घेत असाल तर तुम्हाला अस्थमाचा धोका नसतो. जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यान घालवला तर लोकांचे फुप्फुसाचे रोगही कमी होतात.

वजन करा कमी

(Image Credit : The Independent)

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जे लोक व्हिटॅमिन एन योग्य प्रमाणात घेतात, त्यांना लठ्ठपणा होण्याची समस्या होत नाही. जे लोक निसर्गाच्या जवळ जास्त वेळ राहतात त्यांचं आरोग्य फिट राहतं आणि त्यांचा मेंदूही चांगला काम करतो.

हृदय राहतं निरोगी

(Image Credit : The Conversati)

जसे की, तुम्हाला माहिती पडले की, व्हिटॅमिन एन निसर्गाच्या आजूबाजूला राहून मिळतं. जे लोक निसर्गाच्या जवळ राहतात त्यांना हृदयासंबंधी आजार फार कमी होतात. नैसर्गिक वातावरणात फिरणे, व्यायाम करणे आणि राहिल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं.

स्मरणशक्ती राहते चांगली

(Image Credit : Complete Neurological Care)

शुद्ध हवा आणि वातावरणात राहिल्याने मानसिक थकव्यापासून आराम मिळतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारते. एका रिसर्चनुसार, साधारण ५० मिनिटांसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणाऱ्या लोकांच्या व्यक्तीची स्मरणशक्ती चांगली राहते.

अल्झायमरचा धोका कमी

(Image Credit : DailyCaring)

स्ट्रेस आणि डिप्रेशनमुळे सध्याच्या लोकांना अल्झायमरचा धोका अधिक वाढतो आहे. अशात निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तुम्ही या गंभीर आजाराचा धोका कमी करू शकता. अल्झायमर एक अशी समस्या आहे ज्यात जास्तीत जास्त एक्सरसाइज करणे आणि झाडांच्या सानिध्यात राहिल्याने फायदा मिळतो.

अर्थात हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन एन असेल. जर तुम्हालाही हे आजार दूर ठेवायचे असतील आणि वजन कमी करायचं असेल तर व्हिटॅमिन एनचं प्रमाण चेक करा. 

Web Title: Vitamin N control obesity know other health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.