लंग्स स्ट्रोक रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात व्हिटॅमिन डीच्या गोळ्या - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 01:42 PM2019-01-15T13:42:36+5:302019-01-15T13:44:22+5:30

फुफ्फुसांच्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी (COPD) या आजाराने पीडित असणाऱ्या रूग्णांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डीयुक्त आहार मदत करतो.

Vitamin d tablets can be effective in preventing lung stroke | लंग्स स्ट्रोक रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात व्हिटॅमिन डीच्या गोळ्या - रिसर्च

लंग्स स्ट्रोक रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात व्हिटॅमिन डीच्या गोळ्या - रिसर्च

Next

फुफ्फुसांच्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी (COPD) या आजाराने पीडित असणाऱ्या रूग्णांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डीयुक्त आहार मदत करतो. असा एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनच्या क्वीन मेरी यूनिवर्सिटी ऑफ लंडनमध्ये झालेल्या संशोधनातून व्हिटॅमिन डीच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल या संशोधनातून सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. 

व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं कमजोर होऊ लागतात. ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते त्या व्यक्ती नेहमी आळस करताना दिसतात. 

व्हिटॅमिन डी हे मनुष्याला काही पदार्थ आणि सूर्य प्रकाशातून मिळतं. व्हिटॅमिन डी हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे व्हिटॅमिन डी 2 आणि दुसरं व्हिटॅमिन डी 3 हे दोन्ही व्हिटॅमिन शरीरात कमी असतील तर व्यक्तीला कमजोरी येते.

हाडांचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आवश्यक ठरतं व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डीचा मूळ स्त्रोत म्हणजे सूर्याची किरणं, हे तर आपण सारेच जाणतो. व्हिटॅमिन डी च्या गोळ्या, डेअरी उत्पादनं, मासे आणि काही धान्यांमार्फतही व्हिटॅमिन्सची कमतरचा पूर्ण करता येऊ शकते. विटमिन डी हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनांमधून  सर्दी, खोकला, ताप आणि दमा यांसारखे आजार रोखण्यासाठीही व्हिटॅमिन डी फायदेशीर ठरतं असं सिद्ध झालं आहे. त्याचबरोबर कुपोषित मुलांमध्ये वजन वाढविण्यासाठी किंवा मेंदूच्या विकासाठीही उपयोगी सांगतिलं जातं. 

COPD रूग्णांमध्ये लंग्स स्ट्रोकचा धोका 45 टक्कांनी वाढतो

संशोधनामध्ये असं आढळून आलं की, व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश केल्याने सीओपीडी रूग्णांमध्ये लंग्स स्ट्रोक होण्याचा धोका 45 टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो. COPDने पीडित रूग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. ज्या रूग्णांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण अधिक असते. त्यांच्यामध्ये फारसा फरक जाणवला नाही. फुफ्फुसांच्या संदर्भातील आजारांमुळे झालेले जवळपास सर्वच मृत्यू लंग्स स्ट्रोकमुळे झाले होते. असे थोरेक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये सांगण्यात आले होते. 

Web Title: Vitamin d tablets can be effective in preventing lung stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.