व्हिडीओ चॅटींगमुळे दूर होतं वयोवृद्धांमधील डिप्रेशन - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 10:35 AM2018-12-21T10:35:08+5:302018-12-21T10:36:13+5:30

एकीकडे टेक्नॉलॉजीच्या अधिक वापराने यूजर्स डिप्रेशनचे शिकार होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे टेक्नॉलॉजीच्या मदतीनेच यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला जात आहे.

Video chats can reduce the level depression in older adults | व्हिडीओ चॅटींगमुळे दूर होतं वयोवृद्धांमधील डिप्रेशन - रिसर्च

व्हिडीओ चॅटींगमुळे दूर होतं वयोवृद्धांमधील डिप्रेशन - रिसर्च

Next

(Image Credit : BT.com)

एकीकडे टेक्नॉलॉजीच्या अधिक वापराने यूजर्स डिप्रेशनचे शिकार होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे टेक्नॉलॉजीच्या मदतीनेच यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला जात आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्टमधून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. तसा तर टेक्नॉलॉजीचा जास्त वापर हे तरुण मंडळी करतात, पण याचा फायदा वयोवृद्धांना होत आहे. शोधातून असं आढळलं की, वयोवृद्ध लोकांना जर मित्रांसोबत आणि परिवारातील सदस्यांसोबत व्हिडीओ चॅट करायला सांगितलं तर त्यांचा डिप्रेशन दूर होऊ शकतं. 

अमेरिकेतील ऑरेगन हेल्थ अॅन्ड यूनिव्हर्सिटीने हा दावा केला आहे. इथे करण्यात आलेल्या शोधासाठी ६० वयांपेक्षा अधिक १ हजार ४२४ लोकांवर करण्यात आलेल्या शोधाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. 

दोन वर्ष करण्यात आला शोध

अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकियाट्रीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, डिप्रेशनने पीडित ६० वय वर्ष असलेल्या लोकांना चार गटात विभागून अभ्यास करण्यात आला. प्रत्येक गटातील लोकांना संवादाच्या वेगवेगळ्या माध्यमांशी जोडण्यात आले. त्यात व्हिडीओ चॅट, ई-मेल, सोशल नेटवर्क आणि इन्स्टंट मसेजिंग अॅपला समावेश करण्यात आला होता. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, संवादाच्या चार माध्यमांपैकी व्हिडीओ चॅट हाच पर्याय डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. 

जे वयोवृद्ध व्हिडीओ चॅट प्लॅटफॉर्मसारख्या माध्यमाचा वापर करतात, त्यांना डिप्रेशनचा धोका फार कमी असतो, असं ऑरेगन हेल्थ अॅंड साइन्स यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एलन यांनी सांगितले.  

सोशल मीडियाचा प्रभाव नाही

ज्या वयोवृद्धांनी रिसर्चदरम्यान ई-मेल, मेसेजिंग अॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की, फेसबुकचा वापर केला, त्यांच्या डिप्रेशनचा स्तर टेक्नॉलॉजीचा वापर न करणाऱ्या लोकांच्या बरोबरीत होता. संशोधकांनुसार, व्हिडीओ चॅट आणि डिप्रेशनमध्ये संबंध असल्याचं स्पष्ट करणारा हा पहिलाच शोध आहे. 

वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये जास्त एकटेपणा

दुसऱ्या एका सर्वेतून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. हा सर्वे यूनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टर आणि ब्रुनेल यूनिव्हर्सिटी(लंडन) व्दारे केला गेला. या सर्वेनुसार, वयोवृद्धांपेक्षाही आजची फेसबुकवर राहणारी तरुण पिढीला जास्त एकटेपणा जाणवतो. या सर्वेमध्ये १६ ते २४ वयोगटातील ४० तरुणांनी सांगितले की, त्यांना नेहमीच एकटेपणा जाणवतो. तर ६५ ते ७४ वयाच्या केवळ २९ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनाही एकटेपणा जाणवतो. या सर्वेमध्ये १६ वयापेक्षा अधिक ५५ हजार लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. त्यांना एकटेपणाच्या अनुभवांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.  

यातील जास्ती जास्त वयोवृद्ध हे एकटेपणाचे शिकार नाहीत. तर तरुणांमध्ये एकटेपणाची समस्या अधिक आढळली. काही तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, तरुणांना एकटेपणा यासाठी जास्त जाणवतो की, ते स्वत:ला एक्सप्लोर करण्याच्या वयात असतात. तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, १६ ते २४ वयोगटातील तरुण आपली ओळख शोधण्यात गुंतलेले असतात. याचदरम्यान ते भावनांवर कंट्रोल ठेवणे शिकतात, त्यामुळेच त्यांना एकटेपणा जाणवतो. या सर्वेतून हे समोर आले की, जे लोक स्वत:ला अधिक एकटं फिल करतात ते सोशल मीडियावर अधिक वेळ अॅक्टिव राहणारे असतात. 

Web Title: Video chats can reduce the level depression in older adults

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.