बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी शाकाहारी असूनही आहेत फिटनेस किंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:15 PM2018-08-16T12:15:41+5:302018-08-16T12:16:26+5:30

सध्या अनेक लोकं आपल्या आरोग्याबाबतीत सतर्क झाली आहेत. ते आपल्या फिटनेसबाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत नाहीत. त्यासाठी अनेकांनी ऑरगॅनिक फूडचा पर्यायही स्विकारला आहे.

Vegetarian bollywood actors | बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी शाकाहारी असूनही आहेत फिटनेस किंग!

बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी शाकाहारी असूनही आहेत फिटनेस किंग!

सध्या अनेक लोकं आपल्या आरोग्याबाबतीत सतर्क झाली आहेत. ते आपल्या फिटनेसबाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत नाहीत. त्यासाठी अनेकांनी ऑरगॅनिक फूडचा पर्यायही स्विकारला आहे. तसेच अनेकजणांनी रोज व्यायामासोबतच हेल्दी डाएटही फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. पण काही लोकांना नेहमी एक प्रश्न सतावत असतो की, आपल्या आरोग्यासाठी शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थ खाणं चांगलं आहे. पण तसं नाही. शाकाहारी पदार्थ खाणंही शरीरासाठी आरोग्यदायी आहे. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर, या बॉलिवूडसेलिब्रिटींबाबत जाणून घ्या. हे सेलिब्रिटीं मासांहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात. 

1. शाहिद कपूर

शाहिद बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याच्या सिक्स पॅक्सवर लाखो तरूणी फिदा आहेत. पण त्यासाठी तो कोणतेही प्रोटीन सप्लिमेंट्स घेत नाही. तर त्यासाठी त्याने जास्तीत जास्त व्यायाम आणि हेल्थी डाएट फॉलो केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूरने 'लाईफ इज फेयर' पुस्तक वाचल्यानंतर शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. त्याला हे पुस्तक त्याचे वडील पंकज कपूर यांनी दिलं होतं. ते वाचल्यानंतर शाहिदने मांसाहारी पदार्थ खाणं सोडून दिलं. 2017मध्ये शाहिद सेक्सिएस्ट एशियन मॅन्सच्या लिस्टमध्ये टॉपर होता.

2. जॉन अब्राहम

बॉलिवूडच्या माचोमॅन जॉन अब्राहमही फिटनेसला फार महत्त्व देतो. जॉनला प्राणी फार आवडतात. त्यामुळे तो स्वतःही मांसाहारी पदार्थ खात नाही आणि इतरांनाही मांसाहारी पदार्थ न खाता फक्त शाकाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला देतो. 

3. आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही शाकाहारी सेलिब्रिटींच्या यादीमध्ये आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर सुरुवातीला मांसाहारी पदार्थ खात असे पण काही वर्षांपूर्वी त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडून दिलं असून तो मांसाहारी पदार्थांना हातही लावत नाही.  वयाच्या पन्नाशीचा टप्पा पार करूनदेखील आमिर फिटनेसच्या बाबतीत सर्वांवर मात करतो. 

4. अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चन यांचादेखील शाकाहारी अभिनेत्यांच्या यादीमध्ये समावेश होतो. बीग बींचा मांसाहारी खाण्यापेक्षा हेल्दी खाण्यावर विश्वास आहे त्यामुळे ते डाएटमध्ये शाकाहारी पदार्थांचाच समावेश करतात. एका इंटव्ह्यूमध्ये बोलताना त्यांनी सांगितले होते की, ते सिगारेट आणि दारू यांसारखी व्यसनं अजिबात करत नाहीत. तसेच मांसाहारी पदार्थ खाणंही त्यांनी फार पूर्वीच बंद केलं आहे. 

5. आर. माधवन

आपल्या गोड हसण्यानं तरूणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता आर.माधवनही मांसाहारी पदार्थ खात नाही. एका व्हिडीओमधून त्याने लोकांना अपीलही केलं होतं की, मांसाहारी पदार्थ खाणं शक्यतो टाळा. तसेच त्याने प्राण्यांवर प्रेम करण्याचा आणि त्यांवर होणारे अत्याचार थांबवण्याचा सल्ला दिला होता. हा व्हिडीओ त्याने पेटासाठी केला होता. 

6. विद्युत जामवाल

बॉलिवूडच्या हिट हिरोंपैकी एक असलेला विद्युत जामवल आपल्या किलर बॉडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बॉडी पाहून अनेकांना वाटतं की, प्रोटीन आणि मांसाहारी पदार्थांचा आधार घेऊन त्याने आपला हा लूक बनवला आहे. पण, खरं तर त्याने व्यायाम आणि शाकाहारी डाएटचाच आधार घेत आपली बॉडी तयार केली आहे.

Web Title: Vegetarian bollywood actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.