ऑफिसमध्ये करा १० मिनिटांचा वर्कआउट, दूर पळवा गंभीर समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:57 AM2019-03-14T10:57:29+5:302019-03-14T10:57:38+5:30

आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये कर्मचाऱ्यांना तासनतास एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट एकसारखं अनेक तास बसून राहण्याला योग्य मानत नाहीत.

Tips for office workout that will keep diseases at bay | ऑफिसमध्ये करा १० मिनिटांचा वर्कआउट, दूर पळवा गंभीर समस्या!

ऑफिसमध्ये करा १० मिनिटांचा वर्कआउट, दूर पळवा गंभीर समस्या!

Next

आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये कर्मचाऱ्यांना तासनतास एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट एकसारखं अनेक तास बसून राहण्याला योग्य मानत नाहीत. ते सतत जागेवरून काही वेळेसाठी उठण्याचा सल्ला देतात. कारण सतत बसून राहिल्याने हृदयरोग आणि डायबिटीजसारखे आजार जाळ्यात घेतात. पण याकडे लोक फारसं लक्ष देत नाहीत. वेळ मिळत नाही असं कारण याबाबत दिलं जातं. तुम्ही जर ऑफिसमध्ये बसल्या बसल्या काम करत असाल तर १० मिनिटांचां वर्कआउट करून तुम्ही अनेक समस्या दूर ठेवू शकता. 

'या' गोष्टींची घ्या काळजी

1) जर डेस्कटॉप आणि लॅपटॉप दोन्हींची ऑप्शन असेल तर डेस्कटॉपवर काम करणं कधीही चांगलं होईल. डेस्कटॉपची जागा फिक्स्ड राहते, ज्यामुळे सामान्यपणे पॉश्चर चांगल्या पोजिशनमध्ये राहतं. 

२) कॉम्प्युटर आणि खुर्चीची पोजिशन अशी असावी की, स्क्रीनवर बघण्यासाठी वाकावं लागू नये आणि मान जबरदस्तीने वर उचलावी लागू नये.  

३) कीबोर्ड टेबलवर ठेवण्यासाठी कीबोर्ड ट्रेमध्ये ठेवा. याची काळजी घ्या की, कीबोर्ड कोपराच्या लेव्हल किंवा त्याच्या थोडं खाली असावं. माउस कीबोर्डच्या जवळच ठेवा.  

४) काम करत असताना कोपर आणि हात स्ट्रेट ठेवा. याने खांद्यांना आराम मिळतो आणि त्यांच्यावर प्रेशर पडणार नाही. 

५) जेव्हाही टाइप कराल, तेव्ह काळजी घ्या की, हाताच्या कोपराला पूर्ण सपोर्ट मिळेल. 

६) खुर्ची टेबलच्या जवळच असावी आणि मॉनिटर फार चेहऱ्याच्या फार जवळ असू नये. थोडा दूरच असलेला बरा. 

हे वर्कआउट करणं गरजेचं

१) काम करत असताना मधे-मधे साधारण दोन तासांतून बसल्या-बसल्या किंवा उभे राहून एक्सरसाइज करा. जर उठून जाणे कठीण असेल तर बसूनही एक्सरसाइज करू शकता. याने रक्तप्रवाह चांगला होतो. 

२) हाताचे पंजे आणि मनगटाचा व्यायाम करा. शरीर मागे-पुढे वाकवा. नंतर क्लॉक वाइज आणि अॅंटी क्लॉक वाइज गोल-गोल फिरवा. 

३) खुर्ची मागे करून पाय स्ट्रेच करा. याने मांसपेशींना आराम मिळतो आणि तुम्हाला रिफ्रेश वाटू लागतं. 

४) मानेचा व्यायाम करा. छताकडे बघा. नंतर दोन्ही दिशेने मान हळूहळू गोल फिरवा.

५) दोन्ही हात वेस्ट लाइनला समान टेवा आणि मागच्या बाजूने वाका.

६) दोन्ही खांद्यांचा व्यायाम करा. दोन्ही बाजूने हळूहळू वाकवा. 

७) दोन्ही हात वर करून खांद्यावर ठेवा आणि कोपराला गोल फिरवून झिरो करता येईल असं गोल फिरवा. याने मसल्स लवचिक होतील.

८) हाताची मूठ बांधा आणि सोडा. मनगट गोल फिरवा आणि बोटांना स्ट्रेच करा.
 

Web Title: Tips for office workout that will keep diseases at bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.