सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. सध्या जगभरामध्ये हा आजार चिंतेचा विषय बनला आहे. अनेक कारणांमुळे मधुमेह होतो. डायबिटीज मॅनेजमेंटसाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे, आपल्या आहाराकडे लक्ष देणं आणि त्याचबरोबर अ‍ॅक्टिव्ह राहणं. जर तुम्ही वर्किंग असाल तर, ही दोन्ही कामं करणं अवघड असतं. जर तुम्ही डायबिटीक असाल तर तुमच्या ऑफिसमध्येही अगदी सहज डायबिटीज मॅनेज करू शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी डायबिटीज नियंत्रणासाठी उपाय करू शकता. 

- कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी आपल्या शरीराला प्रॉपर रेस्टची गरज असते,. जर तुम्ही डायबिटीक असाल तर शिफ्ट सुरू होण्याआधीच तयारी करा. रात्रीमध्ये शांत आणि पूर्ण झोप घ्या. उठल्यानंतर एका तासातच नाश्ता करा आणि पाणी पिऊन ऑफिससाठी घरातून बाहेर पडा.
 
- ऑफिसमध्ये आपल्यासोबत इन्सुलिन नक्की ठेवा. तसेच तुम्ही डायबिटीक असल्याचे ऑफिसमध्ये कोणाला तरि आधीच सांगा. जेणेकरून काही समस्या झाल्यास त्वरित उपाय करण्यास मदत होईल.

- ऑफिसमध्ये सर्वांना नाही पण निदान एखाद्या व्यक्तीला तरि तुमच्या या समस्येबाबत सांगा. जेणेकरून शुगर कमी जास्त झाली तर ती व्यक्ती तुमची मदत करू शकते. 

- ऑफिसमध्ये असताना खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या. थोडा थोडा वेळाने काहीना काही खाणं आवश्यक असतं. अशातच जंक फूडऐवजी हेल्दी डाएट फॉलो करा. 

- ऑफिसमध्ये पार्टी किंवा सेलिब्रेशन असेल तर थोडसंचं खा. अन्यथा हाय शुगरचा  त्रास सहन करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये डेस्कवर नेहमी हेल्दी स्नॅक्स ठेवा. यामुळे भूक लागल्यावर तुम्हाला इतर पदार्थांऐवजी तेच पदार्थ खाण्याची इच्छा होइल.


 
- ऑफिस डेस्कवर बसल्या बसल्या काम करत असाल तर एका ठराविक वेळेनंतर जागेवरून उठा आणि वॉक करा. अशावेळी ऑफिसमधून निघताना लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापरही करू शकता. 

डायबिटीजपासून दूर राहण्याचे उपाय : 

- व्यायाम नियमित करा. व्यायामाचे वेगवेगळे फायदे होतात. याने वजन नियंत्रणात राहतं, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि इतरही फायदे होतात. प्रत्येक दिवशी कमीत कमी ३० मिनिटे शारीरित हालचाल करण्याचे अनेक फायदे होतात. 

- पोषक आहार घ्यावा. पोष्टीक कडधान्य, फळं आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करणे फायदेशीर ठरेल. याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड खाणार नाहीत. 

- मद्यसेवन कमी करा आणि धुम्रपान बंद करा. फार जास्त मद्यसेवन केल्याने वजन वाढतं. याने ब्लड प्रेशरन आणि ट्रायग्लिसराइडचा स्तरही वाढतो. तर धुम्रपान करणाऱ्यांना धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत मधुमेह होण्याचा दुप्पट धोका असतो. त्यामुळे धुम्रपान सोडून द्यावे.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. 


Web Title: Tips to manage diabetes at workplace or office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.