केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:14 AM2019-05-16T10:14:46+5:302019-05-16T10:15:24+5:30

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असून तोंडाचा कॅन्सर सर्वात जास्त चर्चेत असतो.

These symptoms of oral cancer and know its treatment | केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे!

केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे!

googlenewsNext

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असून तोंडाचा कॅन्सर सर्वात जास्त चर्चेत असतो. भारतात तोंडाच्या कॅन्सरच्या अनेक केसेस आढळतात. याचं कारण भारतात लोक गुटखा, पान मसाला, तंबाखूचं अधिक सेवन करतात. पण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की, तोंडाचा कॅन्सर हा केवळ पान मसाला, गुटखा खाणाऱ्यांनाच होतो असं नाही. ही धारणाच चुकीची आहे. कारण तोंडाचा कॅन्सर कुणालाही होऊ शकतो.

तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ,ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

कुणाला असतो तोंडाच्या कॅन्सरचा अधिक धोका

सामान्यपणे असं पाहिलं जातं की, तोंडाचा कॅन्सर त्या लोकांना अधिक होतो, ज्यांची इम्यून सिस्टीम कमजोर असते. त्यासोबतच जे लोक चांगल्याप्रकारे तोंडाची स्वच्छता करत नाहीत आणि तोंडात होणाऱ्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा लोकांना तोडांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. तसेच याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की, तोंडाचा कॅन्सरचा सर्वात जास्त धोका तंबाखू किंवा त्यापासून तयार पदार्थांच सेवन करणाऱ्यांना अधिक असतो. 

काय आहेत तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे

१) कॅन्सरच्या सुरूवातीलाच तोंडाच्या आत पांढरी-लाल पुरळ किंवा छोट्या छोट्या जखमा होतात. यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. 

२) तोंडाची दुर्गंधी येणे, आवाजात बदल होणे, काही गिळण्यास त्रास होणे इत्यादी तोंडाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणे आहेत. तोंडाचा कॅन्सर हा तोंडात कुठेही होऊ शकतो.

३) तोंडात जखम असलणे, सूज येणे, लाळेतून रक्त येणे, जळजळ होणे, तोंडात दुखणे इत्यादी गोष्टी तोंडाच्या कॅन्सरकडे इशारा करतात. 

४) तोंडाच्या आत कुठेही गाठ जाणवल्यास तोंडाच्या कॅन्सरचा संकेत असतो. त्यासोबतच तोंडात कोणतही रंग परिवर्तन झालं असेल तर वेळीच तपासणी करावी. 

धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्याल

१) तोडांच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर धुम्रपान, गुटखा, तंबाखू आणि नशेची सवय वेळीच सोडा.

२) दात आणि तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता करावी.

३) जंक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटचे पदार्थ कमी खावेत. तसेच वेगवेगळी फळे खावीत. 

४) तोंडात कोणत्याही प्रकारचा बदल दिसत असेल किंवा तोंडाला असलेली समस्या दूर होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  

Web Title: These symptoms of oral cancer and know its treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.