'या' ६ संकेतांवरून ओळखा शरीरातील हार्मोन्समध्ये झालीये गडबड!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:03 AM2019-02-27T11:03:08+5:302019-02-27T11:06:54+5:30

पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित बदल फार जास्त होतात. शरीरात सर्वात जास्त ज्या हार्मोन्सचा स्तर कमी-जास्त होत असतो.

These six symptoms talk about hormonal imbalance in body | 'या' ६ संकेतांवरून ओळखा शरीरातील हार्मोन्समध्ये झालीये गडबड!

'या' ६ संकेतांवरून ओळखा शरीरातील हार्मोन्समध्ये झालीये गडबड!

googlenewsNext

(Image Credit : www.remediesforme.com)

पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित बदल फार जास्त होतात. शरीरात सर्वात जास्त ज्या हार्मोन्सचा स्तर कमी-जास्त होत असतो त्यात ऐस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन यांचा समावेश होतो. त्यासोबतच मेटाबॉलिज्म हार्मोन थायरॉइड, एनर्जी हार्मोन ऐड्रनलीन, स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल आणि स्लीप हार्मोन मेलाटोनिन यांबाबतही शरीरात नेहमी असंतुलन राहतं. याचा प्रभाव शरीरावर बघायला मिळतो. अशात आम्ही तुम्हाला त्या ७ संकेतांबाबत सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की, तुमच्या शरीरात हार्मोनचं असंतुलन होत आहे आणि तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटायला हवं. 

अचानक वजन वाढणे

जर तुमचं वजन अचानक कमी-जास्त होत असेल म्हणजे फार जास्त वाढत असेल किंवा फार जास्त कमी होत असेल तर तुमच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित बदल होत आहेत. शरीरातील थायरॉइड ग्लॅंड मेटाबॉलिज्मशी संबंधित हार्मोन्ससा नियंत्रित करतो आणि यामुळेच वजन कमी किंवा जास्त होतं. अशात जर तुम्हाला वजनासंबंधी समस्यांसोबतच थंडी, थकवा, ड्राय स्कीन आणि पोटाचीही समस्या होत असेल तर समजून घ्यावं की, तुमचा थायरॉइड ग्लॅंड कमी हार्मोन्स तयार करत आहे. 

सतत थकवा आणि कमजोरी

हार्मोन्समध्ये असंतुलन होण्याचं सर्वात कारण म्हणजे सतत थकवा आणि कमजोरी जाणवणे. खासकरून मोनोपॉज आणि पोस्ट मेनॉपॉजच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांमध्ये हे जाणवतं. स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचा स्तर शरीरात थेट सेरोटोनिन हार्मोन्सला प्रभावित करतो, हा एक हॅपी हार्मोन आहे. त्यामुळे जर तुम्हाला थकवा आणि कमजोरीसोबतच डिप्रेशन व निराशा जाणवत असेल तर हा हार्मोनल गडबडीचा संकेत आहे. 

झोपेत घाम येणे

जर तुम्हाला रात्री झोपल्यावर अचानक जाणवत असेल की, तुम्हाला घामाने फार जास्त भीजले आहात, तर याला नाइट स्वेट म्हटले जाते. मेंदूमध्ये असलेल्या हॅपोथॅलमस शरीरातील तापमान कंट्रोल करण्याला जबाबदार आहे. सोबतच जर हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात एस्ट्रोजनचा स्तर कमी होत असेल तर या दोन्ही गोष्टींमुळे शरीरात ओव्हरहिटींग निर्माण होते. ज्यामुळे हॉट फ्लॅश आणि नाइट स्वेट जाणवतं. हा सुद्धा हार्मोनमध्ये गडबड झाल्याचा संकेत आहे. 

फार जास्त केसगळणे

महिलांना मेनोपॉजच्याआधी, गर्भधारणेवेळी आणि प्रसुतीनंतर केसगळतीची फार जास्त समस्या होते. अमेरिकन हेअर लॉस असोसिएशननुसार, महिलांच्या शरीरात असलेले मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन जेव्हा DTH हार्मोनसोबत परस्पर क्रिया करतात, त्यामुळे केसांचं नुकसान होतं. यावेळी प्रमाणापेक्षा जास्त केसगळती होऊ लागते. 

मूड स्वींग आणि डिप्रेशन

सरोटोनिन आणि इन्डॉर्फिन शरीराला आनंद देणारे हार्मोन्स आहेत. जेव्हा शरीरात या हार्मोन्सचा स्तर फार जास्त वाढतो तेव्हा आपल्याला वेदना आणि त्रास जाणवतो. आणि जेव्हा यांचा स्तर कमी राहतो तेव्हा आपल्याला आनंद आणि सकारात्मकता जाणवते. पण जेव्हा या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं तेव्ह मूड स्वींग होऊ लागतात. सोबतच जेव्हा या हार्मोन्सची निर्मिती कमी होऊ लागते तेव्हा आपल्याला डिप्रेशन आणि तणाव होऊ लागतो. 

अपचन आणि पोटाची समस्या

हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचा मोठा संकेत म्हणजे पचनक्रियेसंबंधी समस्या होणे. याकडे अनेकजण नेहमी दुर्लक्ष करतात. गॅस्ट्रिन, सिक्रेटिन आणि कोलेसायस्टोकिनिन हे ३ हार्मोन्स आपल्या पोटात आढळतात. आणि अन्न पचन करण्यास मदत करतात. या तीन हार्मोन्समध्ये कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. तसेच पोटासंबंधी समस्या होऊ लागतात. 

Web Title: These six symptoms talk about hormonal imbalance in body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.