हाडांसाठी अपायकारक ठरतात 'हे' पदार्थ; अतिसेवनाने कॅल्शिअम होतं नष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:41 PM2019-02-08T13:41:00+5:302019-02-08T13:42:53+5:30

शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्वांप्रमाणेच कॅल्शिअम देखील आवश्यक असतं. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या प्रमाणात कॅल्शिअमची गरज असते.

These food items are bad for bones absorbs body calcium | हाडांसाठी अपायकारक ठरतात 'हे' पदार्थ; अतिसेवनाने कॅल्शिअम होतं नष्ट!

हाडांसाठी अपायकारक ठरतात 'हे' पदार्थ; अतिसेवनाने कॅल्शिअम होतं नष्ट!

Next

(Image Credit : Healthline)

शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्वांप्रमाणेच कॅल्शिअम देखील आवश्यक असतं. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या प्रमाणात कॅल्शिअमची गरज असते. कॅल्शिअम शरीराचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. आपले दात आणि हाडांमध्ये 99% कॅल्शिअम असतं. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता होते. त्यावेळी हाडे कमकुवत आणि नाजुक होतात. अशावेळी हाडांना फ्रॅक्चर होण्याची भिती वाढते. याव्यतिरिक्त शरीराला इतरही अनेक आजार होण्याचा धोका वाढतो.

आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतोच पण त्याचबरोबर शरीराच्या इतर समस्या होण्याचाही धोका वाढतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण दैनंदीन जीवनात ज्या पदार्थांचा आहारात समावेश करतो, त्यांच्या अधिक सेवनाने हाडांमधील कॅल्शिअम नष्ट होऊन जातं. 

चहा, कॉफी यांचे जास्त सेवन करणं

कॅफेनचे जास्त सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जास्त प्रमाणात कॅफेनचं सेवन केल्याने हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे शरीरामधील कॅल्शिअम नष्ट होऊ लागतं. कॅल्शिअमची लेव्हल कमी झाल्याने हाडांवर आणि स्नायूंवर परिणाम दिसून येतो. 

अ‍ॅनिमल प्रोडक्टसमधून मिळणारं प्रोटीन

प्राण्यांपासून मिळणारे खाद्यपदार्थ म्हणजेच, मांस, मासे, अंडी इत्यादी पदार्थांचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. परंतु, जर तुम्ही दररोज याच पदार्थांचे सेवन केलं तर मात्र शरीरासाठी हे हानिकारक ठरू शकतं. 

चॉकलेट जास्त खाणं

सतत चॉकलेट्स खाल्याने हाडं कमजोर होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिस आणि हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. चॉकलेट्समध्ये असलेलं फ्लॅवोनॉल आणि कॅल्शिअम 'बोन मिनरल डेंसिटी'मध्ये बदल घडून आणण्याचं काम करतात. 

ब्रेड, केक आणि इतर बेकरी फूड्स

अनेक लोकांना बेकरी फूड्स म्हणजेच, ब्रेड, बन, केक, टोस्ट यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं पसंत करतात. परंतु, यामध्ये साखरेच्या प्रमाणासोबतच इतरही हानिकारक तत्व असतात. ज्यामुळे या पदार्थांचं जास्त सेवन केल्याने शरीरामधील हाडांवर परिणाम दिसून येतो. 

सॉफ्ट ड्रिंक्स 

सॉफ्ट ड्रिंक्स फक्त आहारातून घेण्यात येणाऱ्या कॅल्शिअमवर परिणाम करत नाही तर तुमच्या शरीरामध्ये आधीपासून असलेल्या कॅल्शिअमही नष्ट करतं. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर सॉफ्ट ड्रिंक्स  म्हणजेच, कोल्ड ड्रिंक्स, सोडा, फ्लेवर्ड ज्यूस इत्यादींचे सेवन करत असाल तर तुमचीही हाडं कमकुवत होतील. त्यामुळे जेवणानंतर चुकूनही सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन करू नका. 

Web Title: These food items are bad for bones absorbs body calcium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.