'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 07:38 PM2019-04-16T19:38:58+5:302019-04-16T19:43:30+5:30

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढविण्यासाठी मदत करतं.

These causes of vitamin d difficency and know its risk factor | 'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं

'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं

googlenewsNext

(Image Credit : Medical News Today)

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढविण्यासाठी मदत करतं. ज्या व्यक्ती शारीरिक श्रम अधिक करतात. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन-डीची अधिक कमतरता आढळते. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीराला इतर समस्या होण्याचाही धोका असतो. 

व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेची कारणं :

1. जेवणामधून जेव्हा आपण पुरेसं व्हिटॅमिन-डी शरीराला मिळत नाही.
2. शरीराला सूर्यकिरणांपासून मिळणारं व्हिटॅमिन-डी पुरेशा प्रमाणात नाही मिळणं.
3. जेव्हा लिव्हर आणि किडनी व्हिटॅमिन-डी योग्य प्रमाणात परिवर्तीत करत नाहीत. 
4. इतर आजारांसाठी खाण्यात येणाऱ्या आजारांमुळे व्हिटॅमिन-डी शरीरापर्यंत पोहोचतं नाही. 

(Image Credit : Better Health While Aging)

व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार :

1. अस्थमा आणि हार्ट अटॅक

व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये सूज वाढत जाते. त्यामुळे अस्थमाची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन-डी शरीरामध्ये सूज वाढविणाऱ्या प्रोटीन्सला फुफ्फुसांपासून दूर ठेवतं. यावयतिरिक्त व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर वाढण्याची आणि हार्ट अटॅक येण्याची शंका वाढते. 

2. कोलेस्ट्रॉल वाढतं

शरीराला ऊन न मिळाल्यामुळे व्हिटॅमिन-डी तयार करणारी तत्व कोलेस्ट्रॉलमध्ये बदलतात. जशी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन-डीचं प्रमाण कमी होतं. तशी रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. ज्यामुळे सर्दी-खोकला आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

3. डायबिटीजचा धोका

व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता जर एकत्र झाली तर मात्र डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. 

4. एनीमियाचं कारण

मुलांमध्ये अधिकवेळ व्हिटॅमिन-डीची कमतरता राहिली तर एनीमियासारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे एनीमिया होण्याचा धोकाही वाढतो. 

5. मेंदूवर परिणाम

व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे मेंदूवर परिणाम दिसून येतो. मेंदूमधील केमिकल सेरोटोनिन किंवा डोपामिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन-डी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्हिटॅमिन-डीचा स्तर योग्य असणं आवश्यक असतं. 

6. इतर आजारांचा धोका

व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे कॅन्सर, टीबी, हाडं कमकुवत होणं, हृदयाशी निगडीत आजार, स्नायूंमध्ये वेदना होणं यांसारख्या आजारांचा धोक वाढतो. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा वाढतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

Web Title: These causes of vitamin d difficency and know its risk factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.