केसांच्या वाढीसाठी ही आहेत सात उपयुक्त नैसर्गिक उत्पादने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:18 AM2018-02-22T02:18:52+5:302018-02-22T02:18:58+5:30

गळणारे केस तुमचा आत्मविश्वास गमावण्यामागील एक प्रमुख कारण ठरू शकते. सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांसाठी मिळणा-या रसायनयुक्त उत्पादनांना याचा दोष दिला जाऊ शकतो.

These are seven useful natural products for hair growth | केसांच्या वाढीसाठी ही आहेत सात उपयुक्त नैसर्गिक उत्पादने

केसांच्या वाढीसाठी ही आहेत सात उपयुक्त नैसर्गिक उत्पादने

googlenewsNext

गळणारे केस तुमचा आत्मविश्वास गमावण्यामागील एक प्रमुख कारण ठरू शकते. सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांसाठी मिळणा-या रसायनयुक्त उत्पादनांना याचा दोष दिला जाऊ शकतो. त्यामुळे या महागड्या, रसायनयुक्त उत्पादनांपासून दूर जाऊन नैसर्गिक उपचारांचे स्वागत केले, तर या समस्येवर मात करू शकतो. हे उपाय परिणामकारक, सुरक्षित आणि सुलभ असून, त्यात रसायने आणि प्रिझर्व्हेटिव्हज् मिसळलेले नाहीत.

आवळा : हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविणारा असून, यात मोठ्या प्रमाणात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स असतात. तो केसांची मुळे अधिक शक्तिशाली करून त्यांना ताकद आणि चमक मिळवून देतो. आवळ्यात आयर्न, अँटिआॅक्सिडंट्स (जसे एलॅजिक, गॅलिक अ‍ॅसिड) आणि कॅरोटिन असतात. त्यामुळे केसातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे डोक्यावरचा कोंडाही कमी होतो.

रोझमेरी : यातील वेदनाशामक घटक असलेल्या कानोसीलमुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे केसांच्या बीजकोषांची वाढ होते आणि केसवाढीला चालना मिळते. केस गळण्याची समस्याही दूर होते.

नारळ : केसवाढीला अडथळा आणणाºया फ्री रॅडिकलला रोखले जाऊ शकते. त्याशिवाय केस चमकदार आणि काळेभोर राहण्यासाठी नारळ उपयुक्त ठरतो.

जोजोबा - यात शीतज्वर गुणवत्ता असल्यामुळे केसांखालील त्वचेला मऊपणा आणि कोमलता मिळते. त्याशिवाय मृत त्वचा, कोंडा, अस्वच्छतेपासून सुटका करून डोक्याची त्वचा स्वच्छ आणि आर्द्र ठेवतो. जोजोबाची परिणामकारकता प्राचीन
काळापासून अवगत असून, याचा वापर जगभरात अनेक औषधांमध्ये केला जातो.

लॅव्हेंडर : लॅव्हेंडरमध्ये लिनालूल आणि लिनालिल अँसिटेट असतात. केसांच्या बीजकोषांत ते खोलवर जाऊन एक सुरक्षित उष्ण स्तर तयार करते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि बीजकोषांच्या वाढीला चांगली चालना प्राप्त होते.

ज्युनिपर : हे तेल केसांची मुळे मजबूत करून वाढीला चालना देते. यात असलेल्या जीवाणूविरोधी गुणधर्मामुळे डोक्यावरील
त्वचेवर पुरळ तयार करणाºया जीवाणूंची वाढ थांबविते आणि पुरळ रोखते.

कॅस्टर : कॅस्टर आॅइल केसांची गळती रोखण्यासाठी वापरले जाते. ते प्रोटिन, मिनरल्स आणि जीवनसत्त्व ‘ई’ने समृद्ध आहे. दुभंगलेल्या केसांसाठीही ते उपयुक्त ठरते.

- अमित सारडा,
वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट

Web Title: These are seven useful natural products for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.