स्ट्रेसला दूर पळवण्यासाठी खा 'हे' पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:02 PM2018-07-20T13:02:53+5:302018-07-20T13:03:56+5:30

सध्याच्या काळात सर्वात गंभीर समस्या कोणती असेल तर ती आहे स्ट्रेस आणि डिप्रेशन. स्ट्रेस कोणत्याही प्रकारचा असेल तर त्याचे कधीही डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज असते.

these 5 foods for immediate stress relief | स्ट्रेसला दूर पळवण्यासाठी खा 'हे' पदार्थ!

स्ट्रेसला दूर पळवण्यासाठी खा 'हे' पदार्थ!

googlenewsNext

सध्याच्या काळात सर्वात गंभीर समस्या कोणती असेल तर ती आहे स्ट्रेस आणि डिप्रेशन. स्ट्रेस कोणत्याही प्रकारचा असेल तर त्याचे कधीही डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज असते. जर याबाबत सतर्कता बाळगली नाही तर गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

बदलत्या जीवनशैलीमुळे डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. कारण सततचं काम, अंतर्गत स्पर्धा यांसारख्या गोष्टींमुळे लोकांना स्वतःसाठीच वेळ देता येत नाही. कामाचा ताण आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी असलेली स्पर्धा यांमुळे लोकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे योग्य वेळेत या स्ट्रेसवर नियंत्रण मिळवले तर डिप्रेशनसारखी गंभीर समस्या दूर करण्यास मदत होते. अनेकदा लोकं स्ट्रेस दूर करण्यासाठी ट्रिटमेंट, औषधांवर खर्च करतात. पण असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनानं तुम्ही अत्यंत कमी पैस खर्च करून घरच्याघरीदेखील स्ट्रेस कमी करू शकता. जाणून घेऊयात स्ट्रेस दूर करण्याचे काही उपाय...

डार्क चॉकलेट

चॉकलेटमुळे मानसिक स्वास्थ राखण्यास मदत होते. त्याचे कारण म्हणजे चॉकलेटमध्ये असलेलं फेनाइलेथालामाइन नावाचे पोषक तत्व. फेनाइलेथालामाइन ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यास आणि डोकं शांत ठेवण्यास मदत करते. चॉकलेटमध्ये अन्य जे पदार्थ आढळून येतात, ते शरिराला हाइड्रेट करण्यासोबतच एनर्जीही देतात. 

ड्राय फ्रूट

हेल्दी राहण्यासाठी ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला आपल्याला अनेक जण देतात. पण काही ड्राय फ्रुट्स मनाचे स्वास्थ राखण्यासाठीही मदत करतात. अक्रोड, बदाम आणि पिस्ता मेंदूला चालना देतात. त्यामुळे तुमच्यावरील स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारं सेलेनियम थकवा आणि स्ट्रेस दूर करतं. 

ब्लूबेरी

तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा जर स्ट्रेसमध्ये असाल तर गोड खाणं नेहमीच फायदेशीर ठरते. ब्लूबेरीमध्ये साखरेचं प्रमाण मुबलक प्रमाणात असून शरीरासाठीही ते लाभदायक असतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडेंट असतं, जे शरीराचा कोणत्याही समस्येपासून बचाव करण्याचे काम करतात. तसेच पोटॅशिअमही असल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्याचे काम करते.

ओट्स 

ओट्स खाल्ल्याने शरीरामध्ये एक विशेष प्रकारचे केमिकल तयार होते. त्यामुळे मेंदूला चालना मिळण्यास मदत होते. सेरोटोनिन नावाचे केमिकल मेंदूसाठी फायदेशीर असते. यामुळे मेंदूला चालना मिळते, तसेच यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. 

चिकन सूप 

चिकन सूप स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करते. जे लोकं नॉनव्हेज खातात. त्यांच्यासाठी हे सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. याच्या सेवनाने थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीही आढळतात. 

Web Title: these 5 foods for immediate stress relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.