TECH: A smart cigarette lighter for smoking habits! | ​TECH : धूम्रपानाची सवय सोडवणारे स्मार्ट सिगारेट लायटर !

बॉम्बस्पोटामुळे नेहमी चर्चेत असणारे लेबनॉनची राजधानी ‘बैरुत’ हे शहर सध्या येथे घडत असलेल्या तांत्रिक घडामोडींमध्ये होणाºया बदलामुळे चर्चेत आले आहे. येथील स्टार्टअप कंपन्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत.
 या देशातील लाखो लोकांना हुक्का पिण्याची सवय असून येथील लोकांच्या धूम्रपानावर नियंत्रण मिळवण्यासाठी समेर अल गरीब यांची ‘स्टाइटर’ नावाची स्टार्टअप कंपनी सध्या चांगले काम करत आहे. या कंपनीने एक स्मार्ट सिगारेट लायटर अ‍ॅप बनवले आहे.
या माध्यमातून युजर किती वेळा धूम्रपान करतो हे या माध्यमातून नोंदवण्यात येते. त्यानंतर वेळोबेळी युजर्सना मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवले जाते. या माध्यमातून धूम्रपान कधी करावे, कधी करू नये याची माहिती दिली जाते. अशा पद्धतीने अनेक टप्पे पूर्ण केल्यानंतर युजरची धूम्रपान करण्याची सवय मोडते.
Web Title: TECH: A smart cigarette lighter for smoking habits!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.