तुम्ही रात्री उपाशीपोटी झोपता का?; 'या' आजारांचा वाढू शकतो धोका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 01:37 PM2019-04-25T13:37:09+5:302019-04-25T13:37:31+5:30

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाचं प्रेशर आणि धावपळीच्या दिनक्रमानंतर अधिकाधिक लोक रात्रीच्यावेळी काही न खाताच झोपतात. तेच काही लोक लठ्ठपणाला कंटाळून रात्रीचं जेवण टाळतात आणि उपाशीच झोपतात.

Sleeping on empty stomach can have negative impact on health | तुम्ही रात्री उपाशीपोटी झोपता का?; 'या' आजारांचा वाढू शकतो धोका 

तुम्ही रात्री उपाशीपोटी झोपता का?; 'या' आजारांचा वाढू शकतो धोका 

Next

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाचं प्रेशर आणि धावपळीच्या दिनक्रमानंतर अधिकाधिक लोक रात्रीच्यावेळी काही न खाताच झोपतात. तेच काही लोक लठ्ठपणाला कंटाळून रात्रीचं जेवण टाळतात आणि उपाशीच झोपतात. पण तुम्हाला माहीत आहे का? असं उपाशी पोटी झोपून तुम्ही स्वतःच तुमच्या आरोग्याची हेळसांड करत आहात. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खरं तर उपाशी पोटी झोपल्याने अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. जाणून घेऊया उपाशी पोटी झोपल्याने शरीराला होणाऱ्या नुकसानांबाबत...

1. एनर्जी होते कमी

अनेक लोकांना वाटतं की, रात्रीच्यावेळी शरीराला अन्नाची गरज नसते. परंतु, हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, शरीर 24 तास एनर्जी प्रोड्यूस करत असतं आणि प्रत्येकवेळी कॅलरी बर्न करण्याचं काम करतं. त्यासाठी शरीराला न्यूट्रिएंट्सची गरज असते. फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी सांगितल्यानुसार, जे पुरूष रात्री झोपण्यापूर्वी प्रोटीन शेकचं सेवन करतात. ते इतरांच्या तुलनेत जास्त एनर्जेटिक असतात. अशाचप्रकारे उपाशी पोटी झोपल्याने दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू लागतो. ज्यामुळे काम करण्याची क्षमता प्रभावित होते. 

2. मेटाबॉलिज्मवर होतो परिणाम

ज्या लोकांना रात्रीचं जेवणं जेवल्याशिवाय झोपण्याची सवय असते. त्यांच्या मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम दिसून येतात. यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या प्रमाणावरही परिणाम होतो. त्याचबरोबर उपाशी पोटी झोपल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड लेव्हलवरही परिणाम होतो. या सवयीमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. 

3. अनिद्रेच्या समस्या 

उपाशी पोटी झोपल्याने रात्री अचानक भूक लागल्यामुळे पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे तुमची झोपही डिसटर्ब होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला शांत झोपेची गरज असेल तर उपाशी पोटी झोपू नका. 

4. वजन वाढतं

लठ्ठपणामुळे पीडित असणाऱ्या अनेक लोकांना असं वाटतं की, आपण जर रात्री उपाशीपोटी झोपलो तर वजन लवकर कमी होतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा समज अत्यंत चुकीचा आहे. दरम्यान, हेल्थ एक्सपर्ट्स अनेकदा रात्रीच्या आहारात पचण्यास हलक्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. परंतु, न खाता झोपल्याने आरोग्याला नुकसानासोबतच वजनही कमी होतं. 

5. शरीरामध्ये न्यूट्रीशन्सची कमतरता 

रात्रीच्यावेळी उपाशीपोटी झोपल्याने शरीरामध्ये न्यूट्रिशन्सची कमतरता जाणवते. हेल्थ एक्सपर्टनुसार, उत्तम आरोग्यासाठी शरीराला अनेक न्यूट्रिएंट्सची गरज असते. परंतु रात्री उपाशीपोटी झोपल्याने व्यक्तीच्या शरीरामध्ये सर्व न्यूट्रिएंट्स कमतरता भासते. ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Sleeping on empty stomach can have negative impact on health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.