चमकदार फळांना बळी पडताय का?; मग 'हे' नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:42 PM2019-04-19T16:42:43+5:302019-04-19T16:53:37+5:30

तुम्ही बाजारात फळं खरेदी करण्यासाठी गेल्यावर तिथे असलेल्या चमकदार फळांना पाहून तुम्ही त्यांना ताजी फळं समजत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.

Shining polished fruits can damage your liver be careful | चमकदार फळांना बळी पडताय का?; मग 'हे' नक्की वाचा

चमकदार फळांना बळी पडताय का?; मग 'हे' नक्की वाचा

Next

(Image Credit : www.hirofukuchi.com)

तुम्ही बाजारात फळं खरेदी करण्यासाठी गेल्यावर तिथे असलेल्या चमकदार फळांना पाहून तुम्ही त्यांना ताजी फळं समजत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. खरं तर ही फळं घातक केमिकल्सचा वापर करून चमकवण्यात आलेली असतात. फळं पॉलिश करण्यासाठी वापरण्यात आलेली रसायनं आरोग्यासोबतच लिव्हरसाठीही अत्यंत घातक ठरतात. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. 

फळं चमकदार म्हणजे ताजी नाहीत

जेवढं या दिवसांमध्ये कृत्रिम पॉलिशने फळांना चमकवण्यात येतं. तेवढी ताजी फळंही चमकदार नसतात. यासाठी वार्निशसारख्या रसायनांचा वापर करण्यात येतो. अनेकदा तर मेणाचा वापर करूनही फळांची चमक वाढविण्यात येते. त्याचबरोबर कार्बाइड पावडरचाही व्यापारी उपयोग करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामुळे मानवाच्या शरीरामध्ये टॉक्सिन्सची मात्रा वाढते. तसेच हे लिव्हर, कीडण्यांसाठी नुकसानदायी असतं. 

(Image Credit : StyleCraze)

द्राक्षं आणि सफरचंद सर्वात जास्त धोकादायक 

चमकदार दिसणाऱ्या फळांमध्ये सर्वात जास्त समावेश हा द्राक्ष आणि सफरचंदाचा असतो. व्यापारी यांवर सर्वाधिक रसायनांचा समावेश करतात. असं मानलं जातं की, फळांमध्ये जेवढा वेळ ओलावा टिकतो तोपर्यंत ती ताजी दिसतात. त्यामुळे दुकानदारांकडून फळांवर मेणाची लेयर चढवण्यात येते. ज्यामुळे फळांचे पोर्स बंद होतात आणि त्यातील ओलावा बाहेर पडत नाही. असं लवकर खराब होणाऱ्या फळांवर करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष आणि सफरचंदाचा समावेश असतो. 

फळं बनतात विष

फळांचं सेवन शरीरामध्ये आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण करतात. परंतु फळांची विक्री वाढविण्यासाठी तसेच त्यांची चमक वाढविण्यासाठी पॉलिश करणं फळांसाठी विषारी ठरू शकतं. ही घातक रसायनं लिव्हरमध्ये पोहोचल्याने त्यासाठी घातक ठरतात. फक्त एवढचं नाही तर यामुळए किडनी डॅमेज होण्याचा धोकाही वाढतो. 

लिव्हरला नुकसान पोहोचवतं

फळांवर वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा थेट परिणाम लिव्हरवर होत असतो. लिव्हर प्रभावित झाल्याने काविळ आणि आतड्यांच्या समस्यांनी त्रस्त होतात. खरं तर तत्काळ उपचारांनी हे ठिक होतं. परंतु त्यानंतर पोटासंबंधीच्या आजारांचा धोका आणखी वाढतो. बराच वेळ अशा फळांचं सेवन केल्याने लिव्हर खराब होण्याची शक्यता आणखी वाढते. 

शरीराच्या इतर भागांवरही होतो परिणाम

चमकदार फळं खाल्याने यामध्ये अस्तित्वात असणारे केमिकल्स शरीरामध्ये जाऊन शरीराच्या अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरतात. खासकरून सर्वात जास्त केमिकलयुक्त फळांच्या सेवनाने लिव्हर खराब होतं. त्यानंतर याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवरही होतो. 

हानिकारक रसायनांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा या टिप्स :

  • खरेदी करताना लक्षात ठेवा की जास्त चमकणारी फळं खरेदी करणं टाळा
  • ज्या फळांना विशेष पॅकिंग करण्यात आलेली असते, त्यांना खरेदी करणं टाळा.
  • सीझनल आणि सहज उपलब्ध होणारी फळं खरेदी करा
  • कधीही फळ न धुता खाऊ नका

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Shining polished fruits can damage your liver be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.