Sexual Health: Keep 'these' 9 things in order to boost happiness! | Sexual Health : तो आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘या’ ९ गोष्टींचे भान ठेवा !

-Ravindra More
कपल्सच्या आयुष्यात सेक्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्यांचे सेक्स लाइफ समाधानी त्यांचे संपूर्ण आयुष्य आंनदाने व्यतित होते, यात तिळमात्र शंका नाही. कारण उत्तम सेक्सलाइफमुळे दोघांचे भावनिक नाते घट्ट होऊन दोघांना मानसिक आधारही मिळतो. यासाठी दोघांनी मनाने आणि शरीराने जवळ येणे महत्त्वाचे असते, मात्र हे नाते अजून सुंदर आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दोघांनीही काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचं असतं. त्यातील महिलांसाठीच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) झोपण्याआधी ब्रश अवश्य करा
तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपण तो आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता. कारण ही दुर्गंधी तुम्हाला एकमेकांच्या जवळ येण्यापासून रोखू शकते. किस किंवा स्मुचिंगच्या दरम्यान दुगंर्धी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सेक्सपूर्वी ब्रश अवश्य करा.

२) आंघोळ करुन शरीर स्वच्छ करा
दिवसभराच्या धावपळीमुळे घामाने भिजलेल्या शरीराला वेगळीच दुर्गंधी येते, त्यामुळे आपला मूड खराब होतो. त्यामुळे सेक्सपूर्वी आंघोळ करताना मान, गुडघे, कोपरे, पाठ स्वच्छ करा. या भागांना स्पर्श केल्यास आॅर्गेझम वाढण्यास मदत होते. यासोबतच तुम्हाला रिफ्रेशिंगही वाटतं.

३) नखं कापा
लांब आणि टोकदार नखांचा तुमच्या साथीदाला त्रास होऊ शकतो. अनेकदा त्यामुळे जखमा होऊन त्यातून रक्तही येतं. त्यामुळे सेक्सपूर्वी नखं नीट कापा आणि त्यांना फाईल करणे गरजेचे आहे.
 
४) कंडोम जवळ बाळगा
सेक्स दरम्यान ‘सुरक्षितता’ अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे यासाठी कंडोम जवळ असू द्या. अनेकदा जोशात आल्यावर कंडोम घेण्यासाठी मध्येच उठावे लागते. त्यामुळे सेक्स मुडही आॅफ होण्याची शक्यता अधिक असते.

५) मूत्रविसर्जन करा 
सेक्सदरम्यान किंवा आॅर्गैझम अंतिम टप्प्यात असताना अनेकींना मूत्रविसर्जनाची इच्छा होते. त्यामुळे सेक्सपूर्वीच मूत्रविसर्जन करा म्हणजे आॅर्गॅझम कमी होणार नाही. पण तसं न केल्याच सेक्सचा मूड आॅफ होण्याची शक्यता अधिक असते.

६) सेक्सी अंतर्वस्त्र वापरा
महागडे नसले तरीही सॅटीन किंवा कॉटनची अंतर्वस्त्र वापरा. यामुळे कम्फर्डच्या सोबतच स्टायलीश लूक सेक्सचा आनंद वाढवण्यास मदत करतात.  

७) माईल्ड परफ्यूम
मंद परफ्यूम तुमच्या सेक्सचा आनंद अधिक वाढविण्यासाठी मदत करतो. यासाठी सेक्सपूर्वी कामक्रीडेदरम्यान एकमेकांच्या सहवासात असताना मंद परफ्यूमचा वापर अवश्य करा. याने तुमच्यासह तुमच्या पार्टनरलाही याचा आनंद मिळेल.

८) पायावरील केस काढा 
स्त्रीच्या शरीरावरील अतिरिक्त केस पुरूषांचा सेक्समधील इंटरेस्ट कमी करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे सेक्सपूर्वी दिवसभर आधीच अंगावरील अतिरिक्त केस काढा. यामुळे लालसरपणा कमी होण्यास मदत होईल.

९) फोन बंद करा
आपल्या आनंदात फोन अडथळा ठरु शकतो. यासाठी सेक्सचा आनंद घेताना फोन बंद ठेवा. शिवाय यादरम्यान फोन चेक करणदेखील टाळा. 
Web Title: Sexual Health: Keep 'these' 9 things in order to boost happiness!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.