हात धुण्यासाठी साबणापेक्षा सॅनिटायझर अधिक चांगलं, जाणून घ्या असेच काही गैरसमज!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:41 PM2019-05-06T12:41:49+5:302019-05-06T12:46:50+5:30

जेव्हा विषय स्वच्छतेचा येतो तेव्हा हातच्या स्वच्छतेचा मुद्दा अधिक चर्चेत असतो. कारण हाताच्या माध्यमातूनच अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं.

Sanitizer is better than soap myths and facts about Handwashing | हात धुण्यासाठी साबणापेक्षा सॅनिटायझर अधिक चांगलं, जाणून घ्या असेच काही गैरसमज!

हात धुण्यासाठी साबणापेक्षा सॅनिटायझर अधिक चांगलं, जाणून घ्या असेच काही गैरसमज!

Next

(Image Credit : swipesense.com)

जेव्हा विषय स्वच्छतेचा येतो तेव्हा हातच्या स्वच्छतेचा मुद्दा अधिक चर्चेत असतो. कारण हाताच्या माध्यमातूनच अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. त्यामुळे आता हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा अधिक वापर केला जातो. हात जर स्वच्छ राहिले तर तुम्ही आजारी पडण्याचा धोका कमी असतो. पण हायजीनच्या नावावर हात धुण्याबाबत वेगवेगळे गैरसमज पसरत आहेत. याबाबत सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. 

गैरसमज - साबणापेक्षा सॅनिटायझर अधिक चांगलं

सत्य - जर तुम्हाला वाटत असेल की, सॅनिटायझरच्या एका थेंबाने हातावरील कीटाणू मरतील तर तुम्ही चुकताय. जास्तीत जास्त सॅनिटायझरमध्ये ६० टक्के अल्कोहोल असतं. जे कीटणू पूर्णपणे मारण्यासाठी सक्षम नसतात. पुन्हा पुन्हा हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केल्याने बॅक्टेरिया सॅनिटायझर प्रति प्रतिरोधक होतात. अशात अ‍ॅंटीबायोटिक औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तेव्हा सॅनिटायझरऐवजी साबण आणि पाण्याने हात धुवावे. सॅनिटायझरने काही वेळेसाठीच कीटाणू मारले जातात. तर साबण आणि पाण्याने हात धुतल्याने जास्त हात जास्त वेळेसाठी स्वच्छ आणि किटाणूमुक्त राहतात. 

गैरसमज - १ मिनिटांपर्यंत होत धुवत राहणे

(Image Credit : Discover Magazine)

सत्य - तुम्हालाही असं वाटतं का की, १ मिनिटांपर्यंत हात घासून घासून गरजेचे असते? पण हे खोटं आहे. हात केवळ २० मिनिटेही साबणाने धुतले तरी चालतं. सॅनिटायझर वापरण्याऐवजी २० सेकंद साबणाने हात चांगले स्वच्छ होऊ शकतात. सॅनिटायझर वापरण्याऐवजी साबणाने हात धुणे गरजेचे आहे. कारण हातांवरील पेशी त्वचेच्या आत जाऊन व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. 

गैरसमज - हात धुण्यासाठी अ‍ॅंटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर कार

(Image Credit : Medical News Today)

सत्य - हात स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅंटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर करणे गरजेचं नाही. नियमितपणे हात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सामान्य साबणाचा वापर करू शकता. अ‍ॅंटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर केवळ आजारी लोकांसाठी किंवा अशा रूग्णांसाठी झाला पाहिजे ज्यांची इम्यूनिटी कमजोर असेल. जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांना स्पर्श केल्यावर अ‍ॅंटीबॅक्टेरिअल साबणाचा वापर करावा. पण अ‍ॅंटीबॅक्टेरिअल प्रॉडक्ट्सचा वापर कमीत कमी करावा, कारण त्वचेतील हेल्दी बॅक्टेरिया याने नष्ट होतात. 

गैरसमज - हात तेव्हा धुवावे जेव्हा फार अस्वच्छ असतील

सत्य  - हे खरं आहे की, मॉयश्चर म्हणजेच ओलावा बॅक्टेरियाला आकर्षित करतो, त्यानंतरही तुम्ही दिवसातून कमीत कमी ६ वेळा हात स्वच्छ करावे. कमीत कमी काही खाण्याआधी आणि टॉयलेटचा वापर केल्यावर हॅंडवॉश करणे गरजेचे आहे. पण जर्म्सच्या भीतीने फार जास्त हात धुवत राहणे एकप्रकारची एंग्जायटी डिसऑर्डर आहे. 

Web Title: Sanitizer is better than soap myths and facts about Handwashing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.