तुम्हालाही सतत थंडी वाजत असेल तर वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 03:30 PM2018-12-19T15:30:07+5:302018-12-19T15:35:32+5:30

सध्या वातावरणातील गारवा वाढला असून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. वातावरणातील गारव्यामुळे तुम्हाला थंडी वाजत असेल तर ठिक आहे.

Reasons why you feel cold all the time | तुम्हालाही सतत थंडी वाजत असेल तर वेळीच सावध व्हा!

तुम्हालाही सतत थंडी वाजत असेल तर वेळीच सावध व्हा!

Next

(Image Creadit: vividoctor.com)

सध्या वातावरणातील गारवा वाढला असून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. वातावरणातील गारव्यामुळे तुम्हाला थंडी वाजत असेल तर ठिक आहे. पण जर तुम्हाला सतत थंडी वाजत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येक वेळी थंडीमुळेच नाही तर अनेक शारीरिक समस्यांमुळे ही समस्या उद्भवू  शकते. 

थंडी वाजण्याचं कारण 

पावसाळा किंवा हिवाळा नसतानाही तुम्हाला सतत थंडी वाजत असेल तर त्यामागे आरोग्याच्या विविध तक्रारी असू शकतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सतत थंडी वाजणं हे अनेक आजारांचं लक्षणंही असू शकतं. जाणून घेऊया सतत थंडी वाजणं ज्या आजारांची लक्षणं आहे त्याबाबत...

एनीमिया

तुम्हीही एनिमियाने त्रस्त असाल तर तुम्हाला उन्हाळ्यातही थंडी वाजते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. अनेकदा थंडीचा त्रास सहन करावा लागतो. 

हायपोथायरॉइड 

हायपोथायरॉइडच्या लक्षणांमध्ये थंडी वाजण्याचा समावेश होतो. कारण थायरॉइड ग्रंथींचं थायरोक्सीन संप्रेरक (हार्मोन) कमी तयार होतं. थायरॉइड ग्रंथी नष्ट झाल्यामुळे हा आजार होतो.


 
डायबिटीज 

डायबिटीजच्या रूग्णांना नेहमी थंडी वाजते. जेव्हा पॅनक्रिया ग्लँड शरीरामधील इन्सुलिन तयार करणं कमी करतात किंवा बंद करतात. त्यामुळे हा आजार होतो. 

एनोरेक्सिया

शरीरातील चरबीचे प्रमाण कमी झाल्यामुळे सतत थंडी वाजते. अशावेळी कॅलरीज वाचवण्यासाठी शरीरातील तापमान कमी होते. हा एक गंभीर मानसिक रोग आहे, ज्यामध्ये व्यक्ती मानसिकरित्या खचते. अनेकदा लोकं जेवण करणं सोडून जातात. 

आयर्नची कमतरता

शरीरातील ऊर्जा कमी होणं, वजन वाढणं तसेच थंडी आणि गरमी सहन न होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच तुमची स्किन सतत कोरडी दिसत असेल तर ते आयर्नच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. शरीरामधील हिमोग्लोबिन संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करतं. 

झोप पूर्ण न करणं 

अनेक लोकांना झोप न येण्याची समस्या असते. त्यामुळे अनेकदा आरोग्याच्या आणि एकाग्रतेच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. एका सामान्य व्यक्तीने रात्री कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घेणं गरजेचं असतं. परंतु अधावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा झोप पूर्ण करणं शक्य होत नाही. याचा परिणाम शरीरातील मेटाबॉल्जिमवर होतो. 

डिहायड्रेशन 

जर तुम्ही दिवसभर घरातून बाहेर काम करत असाल किंवा शारीरिक श्रमाची कामं करत असाल तर तुम्हाला डिहायड्रेशनच्या समस्येचा त्रास करावा लागतो. शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ लागतात. ज्यामुळे थकवा येतो. तहान लागण्याआधी पाणी पिण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे डीहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. 

Web Title: Reasons why you feel cold all the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.