To read from the scorching heat ..! | ​उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी..!

फेब्रूवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीस, हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. या काळात वातावरणाचे तपमान हळूहळू वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि आपल्या अंगाची तलखी सुरू होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपयर्ंत सगळ्यांनाच या उन्हाळ्याचा त्रस होत असतो. या काळात अनेक प्रकारचे आजार आणि विकार उद्भवू शकतात, जसे शरीरातील पाणी व क्षार कमी होणो, संसर्गजन्य आजार, डोळ्यांचे विकार, तसेच मूत्रमार्गाचे, पोटाचे, त्वचेचे आदी विकार उद्भवतात. 

* उन्हाळ्यात कडक उन्हापासून स्वंरक्षण करण्यासाठी टोपी, रूमाल, दुपट्टा, गॉगल आदी वस्तू वापराव्यात, शिवाय उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबुजाचा रस, आइसक्रिम, कैरीचे पन्हे, कोकम शरबत यासारखी शरीरास थंडावा देणारी द्रव्य आदींचे सेवन करावे. 

* अति उन्हामूळे शरीरात शुष्कता येत असल्याने शरीरातील पाणी व ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी खरबुज, टरबुज यासारख्या थंडावा देणा:या फळांचे सेवन करणो हितकारक ठरते.  

* उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी बाहेर पडायचे अगोदर आपापली आवड व सोयीनुसार टोपी, पांढरा दुपट्टा, रूमाल व उन्हाचा गॉगल घेवून उन्हापासून बचाव निश्चित करावा. उन्हात बाहेर निघण्या अगोदर एसी, कुलरची थंड हवा घेणो टाळावे. तसेच बहुतांश काम सकाळी व संध्याकाळी आटोपून घेतलेली बरी.  

* उन्हात भरपूर फिरल्यानंतर थंड पेये पिवून लगेच परत उन्हात जाणो टाळावे. दररोज उन्हात फिरणो आवश्यक असणा:यांनी याची विशेष दक्षता घ्यावी. उन्हात दिवसभर किवा जास्त वेळ फिरायचे असल्यास प्रत्येक अध्र्या तासानंतर सावलीत थांबुन थंड पाणी प्यावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होवून उन लागत नाही. 

* ऊन्हाळ्यात बाजारातील पेयांपेक्षा घरगुती पदार्थांचे सेवन हितकारक असते. उन्हाळ्यात आजारी पडू नये यासाठी बाहेरचे खाद्यपदार्थ, पेय घेणो टाळावे. उन्हाळ्यात लिंबु शरबत, कैरीचे पन्हे, कोकम शरबत, अननस व मोसंबीचा रस, आइस्क्रिम यासारखी शुष्कता घालवून शरीरास ताजेपणा देणारे पदार्थ घरात ठेवणो आवश्यक आहे.

* उन्हात फिरल्यावर उलट्या, जीव मळमळ करणो, चक्कर येणो यासारखे लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यावेत. उन्हाळ्यात उन लागून आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. यासाठी उपाशी पोटी घराबाहेर निघू नये. 

* उन्हाळ्यात जेवणांत कांद्याचा वापर करावा. ग्रामीण भागात उन लागु नये यासाठी लोक पगडी, टोपी किवा शर्टच्या खिशात कांदा ठेवतात. उन लागल्यास घरगुती उपाय म्हणजे कांद्याचा रस काढूण हाता-पायाचे तळव्यांवर लावतात. उन्हाळ्यातील पेहरावही ऋतुमानानुसार बदलत असतो. 

* हिवाळ्यातील गरम कपडे पेटीबंद होवून सुंदर दिसण्या सोबतच उन परावर्तीत करणारे व हवा खेळती ठेवून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे कपडे घालावे. उन्हाळा म्हणजे घामाचा वैताग. उन्हाळ्यात थंड राहणारे कॉटनचे कपडे घालावे. पेहराव शेरवाणी, कुर्ता-पायजामा, शर्ट-पँट ऑकेजन नुसार कोणताही, फक्त तो शरीरास सहायक असायला पाहिजे. 

* उन्हाच्या तीव्र झोतामुळे डोळ्यांची जळजळ होवून नये यासाठी उन्हाचा गॉगल वापरणो फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात बर्फ गोळा, कुल्फी, आइसकांडी, खाण्याचा मोह बहुतेकांना आवरत नाही आणि येथेच फसगत होते. बर्फ बनविण्याची प्रक्रिया, व सार्वजनिक ठिकाणची पेये, बनवितांना वापरण्यात येणारे पाणी, व एकंदरीत स्वच्छता याचा तालमेळ नसतो. यातून उन्हाळ्यात पसरणा:या रोगांच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.  
Web Title: To read from the scorching heat ..!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.