भाज्यांच्या ज्युसची मात्रा ठरतेय गुणकारी,  निरोगी जीवनासाठी चांगला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 09:00 AM2018-05-11T09:00:50+5:302018-05-11T09:00:50+5:30

कारले, टॉमेटो, काकडी, बीट, भोपळा, अननस तसेच बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कडीपत्ता पुदीना या पानांपासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची मागणी सध्या वाढते आहे. निरोगी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून त्यांचा प्रसार सुरू आहे. आरोग्यशास्त्राच्या आधारे तयार केलेले रस चवदार, आरोग्यवर्धक असल्याने सध्या फिरायला जाणाऱ्यांमध्ये त्याची क्रेझ वाढताना दिसते.

The quantity of vegetable juices is of a healthy, healthy lifestyle | भाज्यांच्या ज्युसची मात्रा ठरतेय गुणकारी,  निरोगी जीवनासाठी चांगला उपाय

भाज्यांच्या ज्युसची मात्रा ठरतेय गुणकारी,  निरोगी जीवनासाठी चांगला उपाय

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली -  कारले, टॉमेटो, काकडी, बीट, भोपळा, अननस तसेच बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कडीपत्ता पुदीना या पानांपासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची मागणी सध्या वाढते आहे. निरोगी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून त्यांचा प्रसार सुरू आहे. आरोग्यशास्त्राच्या आधारे तयार केलेले रस चवदार, आरोग्यवर्धक असल्याने सध्या फिरायला जाणाऱ्यांमध्ये त्याची क्रेझ वाढताना दिसते.
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आरोग्याबाबतची सजगता वाढते आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जीममध्ये व्यायाम, चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे, विविध खेळ खेळणे, नृत्यप्रकाराकडे अनेकांचा कल वाढतो आहे. या जोडीला सेंद्रीय भाजीपाल्यावर भर देणे, संतुलित आहार घेणे, जेवणाच्या वेळा पाळणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार, विविध रस (ज्युस) घेण्यावर अनेकांचा भर असतो.
शहरातील मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिरानजीक असलेल्या नाना-नानी पार्क बाहेर सुनीता दवते भाज्यांपासून ज्यूस बनवतात. त्यांचा हा आरोग्यदायी उपक्रम सगळ््यांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. दवते यांचा आहारशास्त्रावर अधिक भर आहे. निरोगी राहण्यासाठी विविध भाज्यांचे रस गुणकारी ठरतात, असे त्यांनी सांगितले.
‘इंटरनॅशनल असोसिएशन सायंटीफिक फॉर पीच ओरायलझम’ या संस्थेने घेतलेल्या सात दिवसांच्या शिबिराला दवते यांनी नुकतीच उपस्थिती लावली. त्याचा त्यांना फायदा झाला. या शिबिरात भाज्या आणि फळांचे रस तयार करायला त्या शिकल्या आणि उद्यानाशेजारी त्याला सुरुवातही केली. तेथे भाज्यांबरोबर मिल्कशेक मिळतात. मात्र, त्यातून विरूद्ध एकत्र एकत्र होऊ नये यासाठी त्या नेहमीच्या दुधाऐवजी नारळचे दूध वापरतात. या कोकोनट मिल्कशेकची चव व स्वादही बदलतो. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स जास्त असल्याने त्याचे पनीर (टोफू), श्रीखंड, मठ्ठा यांची स्वतंत्र श्रेणी आरोग्यसंवर्धनासाठी उपलब्ध झाली आहे.
कारले, टॉमेटो, काकडी एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा गुडघेदुखीवर लाभदायक ठरतो. गाजर, बीट एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा रक्तशुद्धीकरण वाढवतो. दुधी भोपळा व अननस एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा लठ्ठपणा कमी करून पचनशक्ती सुधारण्यास मदत करतो. भाज्यांच्या ज्यूसबरोबरच ग्रीन ज्यूसला मागणी असल्याचे त्या सांगतात.
फळझाडे व फुलझाडांची पाने, बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कढीपत्ता, पुदीना घालून ग्रीन ज्यूस तयार केला जातो. या ज्युसमुळे उत्साह वाढतो. ज्युससाठी वापरली जाणारी काही पाने, फुले ही डोंबिवलीतून मिळतात; तर काही नाशिकहून मागवली जातात. वेगवेगळ््या प्रकारचे ४० ज्यूस ही सकाळी फिरायला येणाºयांची सोबत करतात.

शेवपुरी, पाणीपुरीतही भाज्यांचा रस
-भाज्यांचे सूप, भाज्यांचे कटलेट, भाज्यांची भजी बनवली जाते. त्यातही पिठाचे प्रमाण अवघे २० टक्के तर ८० टक्के भाज्यांचे प्रमाण असते. शेवपुरी, पाणीपुरीत भाज्यांचे रस व कडधान्य वापरले जाते. त्यामुळे ती चवदार बनते.
-भाज्यांच्या ज्यूसमुळे मधुमेह व रक्तदाबाचे आजार दूर पळू लागतात. इतकेच नव्हे, तर डायलिसिसच्या काही रुग्णांनाही त्याचा चांगला लाभ होतो, असा दावा दवते करतात.

Web Title: The quantity of vegetable juices is of a healthy, healthy lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.