गर्भवती महिलांना सतावत असते नोकरीवरून काढण्याची भीती - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 10:08 AM2019-04-22T10:08:55+5:302019-04-22T10:12:23+5:30

प्रोफेशनल विश्वात महिलांसाठी गर्भावस्था एक कठिण कालावधी असतो. केवळ शारीरिकच नाही तर त्यांना वेगवेगळ्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो.

Pregnant women live in fear of being expelled from work says research | गर्भवती महिलांना सतावत असते नोकरीवरून काढण्याची भीती - रिसर्च

गर्भवती महिलांना सतावत असते नोकरीवरून काढण्याची भीती - रिसर्च

Next

(Image Credit : Live Excellent)

प्रोफेशनल विश्वात महिलांसाठी गर्भावस्था एक कठिण कालावधी असतो. केवळ शारीरिकच नाही तर त्यांना वेगवेगळ्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्भावस्थेत येणाऱ्या अनेक अडचणींपैकी एक म्हणजे नोकरी संदर्भात येणारी अडचण. याबाबत करण्यात करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आले आहे की, गर्भावस्थेदरम्यान महिलांना नोकरीहून काढून टाकण्याची भीती सतावत राहते. 

(Image Credit : The Bump)

जास्तीत जास्त नोकरी करणाऱ्या महिलांना असं वाटतं की, गर्भवती राहिल्याने त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. त्यांना कामावरुन काढलं जाऊ शकतं. तर वडील होणाऱ्या पुरुषांना नेहमी नोकरीच्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं. या शोधातील निष्कर्ष एप्लाइड मनोवैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहेत. यात सांगण्यात आलं आहे की, आई होणाऱ्या महिलांना असं वाटत असतं की, आता ऑफिसमध्ये त्यांचं चांगल्याप्रकारे स्वागत केलं जाणार नाही. 

फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, हा अभ्यास त्या महिलांवर करण्यात आला ज्यांना असंत वाटतं की, गर्भावस्थेदरम्यान त्यांना नोकरीवरुन काढलं जाईल. प्राध्यापक पुस्टियन अंडरडॉल म्हणाले की, 'आम्हाला आढळलं की, महिलांनी जेव्हा त्यांच्या गर्भवती असण्याचा खुलासा केला तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये प्रोत्साहन कमी मिळाल्याचं जाणवलं'.

(Image Credit : livescience.com)

काय सांगतो शोध?

पुस्टियन पुढे म्हणाले की, 'जेव्हा महिलांनी गर्भवती असण्याची माहिती मॅनेजर किंवा सहकाऱ्यांना दिली, तेव्हा त्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन मिळण्याचं प्रमाण कमी आढळलं. तर पुरुषांना प्रोत्साहन मिळाल्याचं अधिक बघायला मिळालं'.

निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी पुस्टियनने दोन सिद्धांतांचा खोलवर अभ्यास केला. पहिल्यात आढळलं की, गर्भवती महिलांना नोकरीवरुन काढण्याची भीती सतावत असते. दुसऱ्या पुस्टियन यांना आढळलं की, महिलांना असं वाटण्याचं कारण म्हणजे गर्भावस्थेदरम्यान खाजगी जीवन आणि करिअरच्या क्षेत्रात अनेक बदल होतात.  

(Image Credit : Boldsky.com)

या शोधात गर्भवती महिलांसोबत कशाप्रकारे वागावं याबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुस्टियन यांच्यानुसार. 'आई होणाऱ्या महिलांना करिअरसंबंधित प्रोत्साहन कमी दिलं जाऊ नये. तसेच मॅनेजरने आई आणि वडील दोघांनाही सामाजिक आणि करिअरशी संबंधित शक्य ती मदत करायला हवी. जेणेकरुन काम आणि कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पार पाडता याव्यात.

भारतात बदलतंय चित्र

मातृत्व लाभ संशोधन अधिनियम, २०१७ नंतर भारतात महिलांना या तणावातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला जात आहे. पण तरी सुद्धा काही असंघटीत क्षेत्रांमध्ये तणाव अजूनही आहे. मात्र सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या तणावातून बाहेर येत आहेत. 

Web Title: Pregnant women live in fear of being expelled from work says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.