आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा खाऊ नका बटाटे; 'या' आजारांच्या अडकाल जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:40 PM2019-04-27T16:40:54+5:302019-04-27T16:41:40+5:30

वर्षभर मिळणारा बटाटा प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळून येतो. बटाट्यापासून अनेक झटपट रेसिपी तयार करता येतात. त्यामुळे अनेकदा आहारामध्ये बटाट्याचा सर्रास वापर करण्यात येतो.

Potato eaten more than four times a week can be harmful for your health know its hazards | आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा खाऊ नका बटाटे; 'या' आजारांच्या अडकाल जाळ्यात

आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा खाऊ नका बटाटे; 'या' आजारांच्या अडकाल जाळ्यात

googlenewsNext

वर्षभर मिळणारा बटाटा प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळून येतो. बटाट्यापासून अनेक झटपट रेसिपी तयार करता येतात. त्यामुळे अनेकदा आहारामध्ये बटाट्याचा सर्रास वापर करण्यात येतो. मग ती एखादी भाजी, पराठा, भजी यांसारख्या पदार्थांमध्येही बटाटा वापरण्यात येतो. पण जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर बटाट्यावरचं तुमचं प्रेम थोडं कमी करावं लागेल. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून चार पेक्षा जास्त वेळा बटाटा खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. जाणून घेऊया कारणं...

बटाट्यामध्ये असणारी पोषक तत्व 

बटाट्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी, खनिज तत्व आणि कार्बोहायड्रेट आढळून येतात. बटाट्यावर रिसर्च करणाऱ्या शिमला येथील केंद्रिय संस्थेनुसार, बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असतात. जे आरोग्य उत्तम राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जुन्या बटाट्यांच्या तुलनेत ताज्या बटाट्यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे स्कर्वी रोगापासून बचाव करण्यासाठी मदत करतं. शंभर ग्रॅम बटाट्यामध्ये 20 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी आढळून येतं. पण त्याचबरोबर यामध्ये फॅट्सचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे तज्ज्ञ बटाट्याचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला देतात. 

आठवड्यातून चार पेक्षा जास्त वेळा बटाटा खाऊ नये

बाजारामध्ये बटाटे मुबलक प्रमाणात असून अनेक लोक बटाट्याचा आहारात समावेश करतात. बटाट्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर बटाट्याचंसेवन मर्यादेत करणं गरजेचं असतं. जास्त बटाटा खाल्याने डायबिटीससोबतच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या होण्याचं कारण ठरू शकतं. जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी बटाट्याचं सेवन कमी केलं पाहिजे त्याबाबत...

डायबिटीसने ग्रस्त लोकांनी खाऊ नये बटाटा 

डायबिटीस म्हणजेच शूगरने पीडित असणाऱ्या लोकांसाठी बटाटा अत्यंत नुकसानदायी ठरतो. दरम्यान, साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला बटाट्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतं. ज्यामुळे शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते. 

अॅसिडिटीमध्येही नुकसानदायी 

जर तुम्ही बटाटा खात असाल तर गॅसची समस्या वाढते. बटाट्यामुळे अनेकांना गॅस, अॅसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला गॅसची समस्या होत असेल तर तुम्हाला बटाटा खाणं कमी करावं लागेल. 

ब्लड प्रेशर

बटाटा जास्त खाल्याने ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. रिसर्चनुसार, आठवड्यातून चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा बटाटा खाल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी बटाट्याचं सेवन कमी करा. 

वजन वाढवतो बटाटा 

आपल्यापैकी अनेकजणांना माहीत आहे की, बटाट्याच्या अधिक सेवनाने वजन वाढतं. ज्या लोकांना वजन वाढवायचं असेल त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बटाटा तुम्हाला फायदा नाही तर नुकसान पोहोचवतो. बटाटा खाल्याने फॅट आणि कॅलरी वाढतात. 

Web Title: Potato eaten more than four times a week can be harmful for your health know its hazards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.