This posture is useful to strengthen the shoulder! | खांदा मजबूत करण्यासाठी ही आसने उपयुक्त !

आपल्या शरीराचा खांदा हा अवयव खूपच महत्वाचा आहे. खांद्यामुळे माणसाला उभे रहाणे, झोपणे, उठणे अशा अनेक हालचाली सहज करण्यास मदत होते. या हालचाली करण्यासाठी खांद्यामधील सांध्याची हालचाल महत्वाची ठरते. खांद्याचा सांधा हा शरीरातील एक नाजूक व अस्थिर सांधा आहे. त्याची रचना हालचाल सुलभ करण्यासाठी पूरक असल्याने या सांध्याद्वारे आपण दिवसभर अनेक हालचाली अगदी सहजपणे करु शकतो. आपले खांदे मजबूत असल्यास हात पुढे, मागे करणे, हात अगदी ३६० अंशातून गोलाकार फिरवणे देखील सहज शक्य होते. पण जर खांदेच मजबूत नसतील तर अशा हालचालींमुळे प्रसंगी तुमचा खांदा निखळून तुम्हाला एखादी गंभीर दुखापत देखील होऊ शकते. खांद्याचे कार्य सुरळीत सुरु रहाण्यासाठी या सांध्याला जोडणाºया टीश्यूज मजबूत असणे आवश्यक आहे. तसेच तोल सांभाळणे, ताकद व योग्य अलायमेंट साठी देखील खांद्याचा सांधा महत्वाचा ठरतो. वयोमानानूसार तुमच्या सांध्यामधील लवचिकता व हालचाल कमी होते.त्यात जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर तुमची कार्य करण्याची क्षमता देखील हळूहळू कमी होऊ लागते. खांद्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी योगासने करणे नक्कीच फायद्याचे ठरु शकते.

* पर्वतासन 
खांदा हा अस्थिर सांधा असल्यामुळे त्याला मजबूत करणे आवश्यक असते.कारण कमजोर व कमकुवत खांद्याला सतत वेदना व दुखापतीला सामोरे जावे लागते.त्यामुळे या आसनामध्ये डोक्याच्या दिशेने हात ताणले गेल्यामुळे खांद्यांसह सर्वांगाला चांगला ताण मिळून आराम मिळू शकतो.जाणून घ्या योगा व स्ट्रेचिंगमध्ये नेमका काय फरक असतो.

* शिर्षासन
शिर्षासन करुन तुम्ही तुमच्या खांद्याचे सांधे मजबूत करु शकता.पण हे आसन करताना पाठीमागच्या दिशेने झुकताना तुमचे खांदे पिळले जाणार नाहीत याची विशेष दक्षता घ्या.

* पवनमुक्तासन
या आसनामध्ये पाठ व मान वर घेताना खांद्यांवर पुरेसा ताण येतो.त्यामुळे आसन सोडताना पाठ व मानेच्या मणक्याला आराम देताना तुमचे खांदे देखील सैल सोडणे तितकेच गरजेचे आहे.

* मालासन
मालासन करताना तुमच्या पाठीवर चांगला ताण येतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.यासाठी हे कठीण आसन केल्यावर श्वासावर लक्ष देऊन आराम करा.

 * टिटीभासन 
बकासन करताना तोल सांभाळणे किंचित आव्हानात्मक नक्कीच असू शकते.त्यामुळे तुम्ही पडणार नाही याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.या स्थितीमध्ये काही अंशात स्थिर रहाण्यासाठी प्रचंड ताकदीची गरज असते.
Web Title: This posture is useful to strengthen the shoulder!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.